घर उत्तर महाराष्ट्र भारत जोडो यात्रेप्रमाणेच महाराष्ट्रात कॉंग्रेसची 'जनसंवाद यात्रा'; थोरातांनी बोलून दाखवला 'हाही' निर्धार

भारत जोडो यात्रेप्रमाणेच महाराष्ट्रात कॉंग्रेसची ‘जनसंवाद यात्रा’; थोरातांनी बोलून दाखवला ‘हाही’ निर्धार

Subscribe

नाशिक : सर्वसामान्यांच्या विरोधातील भाजपाच्या धोरणांमुळे सध्या भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. महागाई, बेरोजगारी याविषयी सर्वसामान्यांमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी आहे. काँग्रेस हाच सर्वसामान्यांचा खरा वाली असून जनसंवाद यात्रेतून काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्यांना पटवून देण्यात येतील असे विचार काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर येथे काँग्रेसतर्फे 3 ते 12 सप्टेंबरदरम्यान जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीचे आयोजन रण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. हिरामण खोसकर, आ. उल्हास पाटील, आ. शिरीष कोतवाल, माजी आमदार शोभाताई बच्छाव, नाशिक ग्रामीण अध्यक्ष तुषार शेवाळे, मालेगाव महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग, नाशिकचे शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक नगर धुळे जळगाव जिल्हाध्यक्ष, धुळे नाशिक महानगर अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाई, बेरोजगारी, ढासळती कायदा व सुव्यवस्था यासह विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रा सुरु केली आहे.यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्ते शहरवासियांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस सरकारच्या कामगिरीची आणि विद्यमान राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची जनतेला जाणीव करून देणार आहेत. भाजप सरकारला जवळपास तीन वर्षे झाली आहेत असे असतानाही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था अशा विविध प्रश्नांवर कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. तीन महिने चालणार्‍या जनसंवाद यात्रेत कार्यकर्ते शहरातील सर्व वाड्यांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधून राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची जाणीव करून देणार आहेत. लोकविरोधी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठीच जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी शेवटी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -