घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'पीएफआय'च्या 'त्या' सदस्यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध

‘पीएफआय’च्या ‘त्या’ सदस्यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध

Subscribe

नाशिक : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या देशभरातील ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी मागील काही दिवसात धाडी टाकल्या. त्यातून पीएफआय संघटनेचा अनेक देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग समोर आला होता. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या संघटनेवर बंदी टाकण्याचाही निर्णय घेतला. याचवेळी जिल्ह्यातील मालेगाव शहरतही धाडी टाकून काहींना ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या पीएफआय संघटनेच्या सदस्यांबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. २०१० साली पुण्याच्या जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मालेगावातून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय संघटनेच्या सदस्यांशी संबंध असल्याच उघड झालं आहे.

मागील महिन्याभरापासून देशभरात पीएफआय संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए आणि दहशदवाद विरोधी पाथक म्हणजेच एटीएस यांच्याकडून धाडी टाकण्यात आल्या. त्यातून पीएफआय संघटना मनी लॉंड्रिंग, दंगली घडवणे, दहशत माजवणे अश्या संबंधीच्या अनेक देशविघातक कृत्यात सामील असल्याचे उघड झाले होते. याच दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. जिल्ह्यातील मालेगाव शहरतही धाड टाकत पीएफआयच्या काही सदस्यांना अटक केली होती. यातील प्रमुख पदाधिकारी असलेल्या सैफुर रहमान याच्यासह अजून काही सदस्यांना एटीएसने अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ११ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. याच दरम्यान  एटीएसने त्यांची कसून चौकशी केल्यानंतर पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपींशी पीएफआयच्या सदस्यांचे संबंध समोर आले आहेत. दरम्यान, संशयितांना पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायलयात हजर केल असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी आणखी १४ दिवसांसाठी वाढवून दिली आहे.

- Advertisement -
एटीएस नाशकताच तळ ठोकून 

मालेगावातील हुडको कॉलनी येथून सैफुर रहमान यास अटक केल्यानंतर दहशदवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने नाशकातच तळ ठोकला आहे. मालेगावसह राज्यातील बीड, कोल्हापूर, जळगाव येथून ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या सदस्यांनाही नाशकातच ठेवण्यात आले आहे. त्यांना नाशकातील न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -