लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने पालिकेस दिले निर्माल्य कलश

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा प्रारंभ महापालिकेस निर्माल्य कलश देऊन झाला. यानिमित्त महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते गोदावरी नदीवर ठेवण्यासाठीच्या निर्माल्य कलशांचे लोकार्पण करण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यात २ ते ८ या तारखेला जगभरात लायन्स सदस्य सेवासप्ताह साजरा करतात. यात जिल्हा प्रांतपालांनी दिलेल्या कार्यक्रमाअंतर्गत ‘स्वच्छ नदी’ अभियानात नाशिकच्या गोदावरी नदीचे पावित्र्य अबाधित राहावे या उद्देशाने नाशिक स्टार क्लबकडून महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दोन निर्माल्य कलश स्थापन करण्यात आले. घारपुरे घाट आणि चोपडा लॉनजवळील नदीवरील पूलावर हे कलश ठेवण्यात आले. या कलशांमुळे नदीप्रदूषण कमी होईल अशी ही संकल्पना आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत भरबत आणि नीलिमा डावरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या प्रसंगी सभागृह नेता सतिश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, वैभव कुलकर्णी, क्लबच्या सचिव सारिका कलंत्री , कोषाध्यक्ष अभय पाटील, अमित प्रभू,उर्जा पाटील, निशा भरबत, प्रशांत भरबत, मनीषा लड्ढा, संतोष कलंत्री, अभय बाग, मीरा मराठे, गोपाळ बिरार, ललित पवार ,नेत्रा पवार उपस्थित होते.

स्वच्छ, आरोग्यदायी नाशिकसाठी उपक्रम उपयुक्त

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने राबवलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अव्वलस्थानी आनण्यासाठी आणि निरोगी वातावरणाला चालना देण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल.
-सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक