मुंबई : राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन आज 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले. ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रजांचे कौतुक करत असताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. (Literary should speak on the murky political situation Raj Thackeray opinion)
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही. माझ्याआधी येथे अनेकजण बोलले. पण मी जेव्हा इंग्लंडला गेलो होते तेव्हा सेक्सपिअरच घर बघितलं. तिकडच्या लोकांनी ते जपून ठेवलं. आपली लोकं ते जपतायेत. आपल्याकडे असच एखादं संमेल्लन भरतं लोक येऊन बोलतात पण पुढे काही होत नाही. आपल्याकडेही मोठे लेखक, कवी आहेत. परंतू या कवींना जी परमेश्वरांनी शब्दांची ताकत दिली आहे. त्या ताकतीचा आपल्या आजुबाजुला जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर जर कवी, लेखक बोलले तर कवींचेही महत्व वाढेल. जे आपल्या अवतीभोवती गढूळ वातावरण तयार झाले आहे त्यावर भाष्य होणं गरजेचे आहे आणि त्याचवेळी भाष्य होणे गरजेचे आहे. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : नागपुरात फडणवीसांनी नागरिकाचा हात खेचला अन् राजकारण रंगले… नक्की काय घडले?
नुसतेचच म्हणायचे की, महत्व दिले जात नाही
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी सांगलीला एका संमेलनात गेलो होतो, तेव्हाच म्हटलं होतं की, कुठल्याही एका राजकीय पक्षाची बाजू घेणं किंवा विरोध करणं नाही पण असलेल्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी त्याचवेळी साहित्यीक, लेखकांनी पुढे आले पाहीजे. नुसतेच म्हणायचे की आम्ही कविता करतो, इतक्या कविता झाल्या, इतके कवी होऊन गेले परंतु त्यांना काही महत्व प्राप्त होत नाही परंतू महत्व प्राप्त व्हावं यासाठी तुमच्याकडूही तशी पाऊल उचलले गेली पाहीजे असाही सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित लेखक, कवींना दिला.
हेही वाचा : मणिपूर पुन्हा धुमसतेय; आसाम रायफल्सच्या पत्राने उडवली पोलिसांची झोप
कुसुमाग्रज किती मराठी माणसांना कळाले माहिती नाही
यावेळी त्यांनी कुसुमाग्रज यांच्याविषयीही भाष्य केले. ते म्हणाले की, कुसुमाग्रजबद्दल मी अनेकांना सांगत असतो. माणूस किती मोठा, त्या माणसाचं मोठेपण किती मराठी माणसांना कळले हे मला माहिती नाही पण त्यांच्याविषयी मी एक लेख वाचत होतो. त्यामध्ये लिहलं होतं की, जेव्हा ऋषिकेश मुखर्जींनी जेव्हा आनंद चित्रपट केला तेव्हा, आनंद चित्रपट रिलीज झाला तेव्हा काही एवढी थिअटर्स नव्हती. तेव्हा त्यांनी त्या चित्रपटाची रिळं गाडीत घातली. ते मुंबईवरून नाशिकला गेले आणि त्यांनी एक थिअटर्स बुक केलं. त्यांनी कुसुमाग्रजाना तो चित्रपट दाखवला. तो चित्रपट त्यांनी पहावा आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांना हवी होती. एका बंगाली माणसाला त्याच्या चित्रपटावर एका मराठी माणसांची प्रतिक्रिया हवी होती. या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी माणसं जन्माला आली त्याच आपल्यालाच कौतुक नाही असेही ते यावेळी म्हणाले.