विधान सभा आणि परिषदेतील आजचे कामकाज स्थगित
संजय राऊतांवर हक्कभंग आणण्यासाठी दोन दिवसांची चौकशी, पुढील निर्णय ८ मार्चला सुनावणार- राहुल नार्वेकर
सभागृहात गोंधळ, हायहायच्या घोषणात देत सत्ताधारी आक्रमक
विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
हक्कभंग प्रकरणावरून विधान परिषदेतही गोंधळ
संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण विधानमंडळाचा अपमान झाला आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सत्ताधाऱ्यांकडून विधानपरिषदेत संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी
गुलाबराव पाटील – विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारा ही कोणती औलाद आहे? सभागृहाची गनिमा आहे. लोकांच्या मतावर येथे आलो आहे. यांच्यासारखे मागच्या दरवाजाने आलो नाही. यांनी शिवेसनेची वाट लावली. उरलेल्या १६ चीही वाट लावतील. उद्धव ठाकरेंनाही उल्लू केलं. ३५- वर्षे काम करणाऱ्यांची वाट लावली. शिवेसनेची वाट लावण्याऱ्याने
या सभागृहाचा अपमान केला आहे. चार लाख लोकांतून निवडून येतो, चोर नाही. या चोराने आमची मते घेतली आहे. गनिमा राखायची असेल तर आज त्यांनी खासदारांचा राजीनामा द्यावा.
भास्कर जाधव – या सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल, सन्मानाबद्दल अपमान होत असेल तर परंपरेनुसार काही निर्णय झाले तर मान्य केले पाहिजेत. सभागृहात हा विषय आला तेव्हा मी येथे नव्हतो. सभागृहात काय विषय चाललाय याची माहिती घेतली. पण तो कोणत्या टिपेला गेला हे मला माहित नाहीत. पण अध्यक्षांच्या मार्फत मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की परंपरेनुसार, चहापानाला बोलावलं जातं. आम्ही चहापानाला गेलो नाही म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले. हेच मुख्यमंत्री अडीच वर्षे मांडीला मांडी घालून बसले होते.
शंभूराज देसाई – अधिवेशन संपण्याआधी हक्कभंग समितीचा निर्णय जाहीर करावा
नाना पटोले – हक्कभंगाचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही याबाबत निर्णय घ्यावा. राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न आहे, त्यावर बोलायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
नितेश राणे- रोज सकाळी बसून संजय राऊतांना ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे. आपण काय खाललं आहे याचं. त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध काय आहे? सामनाच्या आधी तो लोकप्रभामध्ये असयाचा. तेव्हा शिवसेनेविरोधात त्यांचे लेख असायचे. बाळासाहेब ठाकरेंविरोधात लिहिलं आहे त्यांनी. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं संरक्षण काढा. पोलिसांचं संरक्षण काढा. दहा मिनिटे संरक्षण काढा परत उद्या सकाळी ते दिसणार नाहीत.
संजय राऊत राजकीय बलात्कार करतोय – संजय शिरसाट
विधानपरिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब
विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक
संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्यासंदर्भात होणार चर्चा
सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी पुन्हा तहकूब
भरत गोगावलेंनी उच्चारलेला असंसदीय शब्द घेतला मागे
सभागृहाची बैठक दहा मिनिटांकरता तहकूब
विधिमंडळ म्हणजे केवळ सत्ताधारी पक्ष नव्हे, निवडून आलेले सर्व पक्ष असतात. यावर हक्कभंग घेतलाच पाहिजे – यामिनी जाधव
विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणं चुकीचं आहे – बाळासाहेब थोरात
एका बातमीवरून कोणाला टार्गेट करू नये
ती बातमी खरेच असेल तर संबंधितावर कारवाई व्हावी
पक्षीय भेदाभेद बाजूला सारून भूमिक घ्यावी
विधिमंडळातील सदस्यांचा मान राखला पाहिजे – अजित पवार
विधिमंडळाला चोर म्हणणं चुकीचं – अजित पवार
संजय राऊतांवर कारवाई करा, आशिष शेलार आक्रमक
या सदनात बसलेल्या सदस्यांना चोर म्हणतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझी विनंती आहे की या पद्धतीने आपल्या सर्वांचा उल्लेख होणार असेल तर हे विधिमंडळ एक आहे की नाही, बोटचेपी भूमिका अपेक्षित नाही – आशिष शेलार
शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत नियमित कामकाजपूर्वी बैठक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस