घरCORONA UPDATE...तर लॉकडाऊनमध्येही तुम्हाला मिळू शकते दारू

…तर लॉकडाऊनमध्येही तुम्हाला मिळू शकते दारू

Subscribe

लॉकडाउनचा मोठा फटका  मद्य उत्पादक क्षेत्रालाही बसला आहे.

कोरोनामुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे सहाजिकच हॉटेल, बार दारूची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दारूची दुकानं बंद असल्यामुळे गेले काही दिवस वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांमध्ये चोरी करण्यात आली आहे. तर काही मद्यपींनी दारू समजून मिथेल, सॅनिटायझर प्यायल्याचाही घटना घडल्या आहेत. पण मद्यपींसाठी खूषखबर आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दारुची दुकाने खुली करण्याचे संकेत दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना फेसबुक लाईव्ह दरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला. राज्य सरकारकडून अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र बंदी असलेल्या यादीत दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. तसंच ते कधी सुरु होणार याचाही उल्लेख नाही?

- Advertisement -

या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, जाहीर झालेल्या यादीत काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याचा स्पष्ट उल्लेख आहे. जर सोशल डिस्टन्सिंगचं अत्यंत योग्य पद्धतीने पालन केलं तर कोणतीही बंदी असणार नाही.

लॉकडाउनचा मोठा फटका  मद्य उत्पादक क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीज् (सीआयएबीसी) या संघटनेनं महाराष्ट्रात ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यासंदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.

- Advertisement -

जर दुकानं खुली करणं शक्य नसेल तर सरकारनं कमीत कमी ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी द्यावी. त्यामाध्यमातून घरपोच डिलिव्हरी करता येईल. यासंदर्भात संघटनेनं मुख्यमंत्र्यांनापत्र पाठवलं आहे. यात मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी पद्धतीनं मद्य विक्री सुरू करण्यात आली असल्याचंही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे,’.


हे ही वाचा – भारताकडून चीनची तटबंदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -