घरदेश-विदेशLive Update : गोरेगावमध्ये थोड्याच वेळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची...

Live Update : गोरेगावमध्ये थोड्याच वेळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची शिवगर्जना सभा 

Subscribe

गोरेगावमध्ये थोड्याच वेळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची शिवगर्जना सभा


अदानी समूहातील महाघोटाळ्याविरोधात मुंबईत सोमवारी काँग्रेसचा मोर्चा

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा

सोमवार १३ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा निघणार

- Advertisement -

या मोर्चाच्या माध्यमातून राजभवनला घेराव घातला जाणार


१ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची सभा होणार

१६ एप्रिलला नागपूरमध्ये, ३ जूनला नाशिक, पुण्यात १४ मेला सभा

ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सभेला उपस्थित राहणार


आजपासून नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च

नाशिकमधील लाल वादळ विधानभवनावर धडकणार

शेतकरी प्रश्नांसाठी संघटना आक्रमक


नैसर्गिक शेतीला भर दिली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा

पाणी फाऊंडेशनचं काम उल्लेखनीय – देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचे गट वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलं

दिवसा बारा तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी, शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. आता निर्णय घेतला आहे की अॅग्रीकल्चर फीडर सोलरवर आणणार, त्यामुळे दिवसा बारा तास शेतकऱ्यांना मिळेल – फडणवीस

राळेगणसिद्धीत हा प्रयोग केला होता. हा प्रयोग यशस्वी झाला.


शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणी दोघांना अटक


भाजपा ब्लॅकचं व्हाईट करणारं यंत्र आहे का – सुषमा अंधारे

स्वच्छता दूत असलेले किरीट सोमय्या ज्यांच्यामुळे भाजपाचे सरकार स्थापन झालं आहे असं म्हणायला हरकत नाही – सुषमा अंधारे

स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते, मात्र अद्यापही पत्राचं उत्तर नाही


शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसाठी सांगलीत आंदोलन


आपल्याला जलयुक्त शिवाराशिवाय पर्याय नाही – देवेंद्र फडणवीस

पहिल्या टप्प्यात ५ हजार गावांचा समावेश

पाणी फाऊंडेशनला सोबत घेऊन काम करणार

प्रत्येक शेतकरी ट्रेनर होतोय, मागच्या काळातही पाणी फाऊंडेशनला सोबत घेऊन काम केलंय


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू


माधुरी दीक्षित यांना मातृशोक

वयाच्या ९१ व्या वर्षी स्नेहलता दीक्षित यांनी घेतला अखेरचा श्वास


१० मार्च रोजी आदिस अबाबाहून मुंबईत आलेल्या तीन परदेशी नागरिकांकडून १.४० कोटी रुपयांचे ३ किलो सोने जप्त करण्यात आले. अंडरगारमेंट्स आणि फुटवेअरच्या इनसोलमध्ये सोने लपविल्याचे आढळले: मुंबई कस्टम्स


ईडी चौकशीनंतर हसन मुश्रीफ नॉट रिचेबल

हसन मुश्रीफांना उद्या चौकशीसाठी बोलावले


आज मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा


बावधानमध्ये प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात, आज मुख्य दिवस

महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेसाठी दाखल


ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन. वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गोरेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी शनिवारी रात्री 10 वाजता निधन झाले. गेले दोन-तीन महिने ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. अंत्ययात्रा रविवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.


हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी ईडीचा पुन्हा छापा


आज देशभरात रंगपंचमीचा उत्साह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -