Live Update : मातोश्रीवर मविआतील नेत्यांची बैठक; अजित पवार, संजय राऊत, जयंत पाटील, एकनाथ खडसे बैठकीला उपस्थित

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

मातोश्रीवर मविआतील नेत्यांची बैठक, अजित पवार, संजय राऊत, जयंत पाटील, एकनाथ खडसे बैठकीला उपस्थित


टाटा ट्रस्टच्या सीईओ पदी सिद्धार्थ शर्मा यांची नियुक्ती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री अमित शाहांसोबतची बैठक संपली


नगरमध्ये मुलांने मुलीला पळवून आणलं म्हणून एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु


केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत सहकार क्षेत्राशी निगडीत बैठक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या बैठकीसाठी शिंदे, फडणवीस, पंकजा मुंडे दाखल


शिंदे-फडणवीस अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना


अजित पवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

सायंकाळी ९ वाजता मातोश्रीवर घेणार भेट


दिल्लीत भूकंपाचे धक्के, ५.४ रिश्टर स्केल तीव्रता

३० सेकंद जाणवले धक्के


तिसऱ्या वनडे सामन्यात न्युझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

तिसऱ्या सामन्यात भारताची पहिली फलंदाजी


अर्थसंकल्पाआधीच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार – फडणवीस


अनिल परब यांच्या रिसॉर्ट परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन

साई रिसॉर्ट प्रकरणी दापोलीतील तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचं निलंबन

पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन, चौकशीही होणार


शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

विविध राजकीय मुद्द्यांवर होणार चर्चा

११ वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात नेत्यांची बैठक


मुंबई महापालिका शिवसेनेने शेठजीसारखी चालवली – आशिष शेलार

उद्धव ठाकरे अपयशी नेता- शेलार

उद्धव ठाकरे भावालाही सोबत ठेवू शकले नाहीत –  शेलार


धक्कादायक, पुण्यातील नदीपात्रात ५ दिवसांत आढळले ४ मृतदेह

२ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश


पश्चिम रेल्वेच्या गाड्या १० मिनिटे उशिराने


मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझरचा अपघात, टायर फुटून वाहन थेट नदीत

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर अपघात

वाहन अद्यापही सापडलं नाही, त्यामुळे त्यातून प्रवास करण्यांऱ्यांचीही माहिती अस्पष्ट


अमेरिकेच्या अयोवातील एका शाळेत गोळीबार, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, एक शिक्षक जखमी


इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, ५.५ रिश्टर स्केलवर तीव्रता