वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दादरच्या शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महारासभेचे 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
एफआयआरमध्ये पहिलं नाव शरद पवाराचं – नामदेव जाधव
राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर नामदेव जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्यावरील हल्ल्यासाठी मी कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. परंतु यासाठी शरद पवाराचं एफआयआरमध्ये पहिलं नाव आणि दुसरं नाव रोहित पवारांचं असणार आहे. या दोघांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुण्यात नामदेव जाधवांना फासलं काळ
लढताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना अभिमान वाटेल – आदित्य ठाकरे
मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना (बाळासाहेब ठाकरे) अभिमान वाटेल. ब्रिजचं काम एवढं लेट का झालं? कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट का केलं नाही? असे प्रश्न उपस्थित करत आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील उदयनराजेंच्या भेटीला
जलमंदिर पॅलेस निवासस्थानी दाखल
जहांगीर आर्ट गलरीत राज ठाकरे दाखल
अंजली दमानिया यांना ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
छगन भुजबळांच्या घराबाहेर घेणार होत्या पत्रकार परिषद
मुंबईतील माझगाव परिसरात गोळीबारी
माझगावमधील अफजल रेस्टॉरंटमध्ये गोळीबारी
वांद्रे परिसरात गॅसचा स्फोट; आठ जण जखमी
मुंबईतील वांद्रे परिसरात LPG गॅसचा स्फोट झाला, या स्फोटात पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे
आदित्य ठाकरेंवर मध्यरात्री गुन्हा दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.