राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत
शरद पवारांचा 2 दिवस बारामतीत मुक्काम
16 ऑगस्टला बारामतीहून छत्रपती संभाजीनगरला जाणार
ट्विटरद्वारे कमाई करणाऱ्यांना आता भरावा लागणार 18 टक्के जीएसटी
लाल किल्ला परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वाहनांना बंदी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहने आणि मध्यम वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला असून वाहतूक विभागाचे अधिकारी एसएस यादव यांनी माहिती दिली आहे.
अजित पवारांना वडिलकीच्या नात्याने भेटलो – शरद पवार
कळवा रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठीत
आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीत नेमण्यात आली आहे.
या समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह जेजे रूग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.
कळवा रूग्णालयात एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 8 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे. या रूग्णांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आणि त्यांच्या मृत्यूला रूग्णालय प्रशासन जबाबदार आहे का? याची कारणं समिती शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.
गणपतरावरावांनी जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम अखंडपणानं केलं – शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यात
शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या अनावर कार्यक्रमासाठी उपस्थित
ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
13 रुग्ण आयसीयू, 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील
सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत
पवारांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, पृष्पवृष्टीने केलं स्वागत
मुंबईत अनेक ठिकाणी मिशन ऑल आऊट अंतर्गत नाकाबंदी; स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिसांचा मोठा निर्णय
सोलापुरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर
शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज एकाच मंचावर येणार आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे ट्रॅफिक जॅम
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळ आणि देवस्थानावरील पर्यटकांच्या गर्दीची शक्यता आहे. सलग सुट्टया आल्याने अनेकजण आपल्या गावी जात असतात. तर काही जण पर्यटन आणि देवस्थानावर जात आहेत.