IND vs PAK : भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी केला पराभव
पाकिस्तान संघ 128 धावांवर सर्वबाद
कुलदीप यादवने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर जयप्रती बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठराव – एकनाथ शिंदे
IND vs PAK : पावसाच्या व्यत्ययानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरूवात
मराठा आरक्षणासंदर्भात दरवर्षी सरकारकडून फक्त आश्वासन – संभाजीराजे
न्यायपद्धतीने कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायला पाहिजे, नुसतं मराठा समाजाला खुष करण्यासाठी जीआर काढला तर ते मुळीच चालणार नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंनी भूमिका केली स्पष्ट.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे सुरूवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी मंत्री उपस्थित आहेत.
IND vs PAK : भारतीय संघाने 2 गमावत बनवल्या 356 धावा
विराट कोहली आणि केएल राहुलची शतकं
IND vs PAK : दुखापतीतून सावरल्यानंतर केएल राहुलचं खणखणीत शतक
विराट कोहलीचंही 84 चेंडूंत शतक
भाजप मंत्र्याविरोधात भाजप खासदारांचे आंदोलन
भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली भंडारा इथे धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने ढोल बजाव आंदोलनट
शुक्रवारी धनगर समाजातील व्यक्तीने राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता, ज्यानंतर विखे पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकानी धनगर समाज बांधवांना जबर मारहाण केली होती, त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये धावत्या कारची डिव्हायडरला धडक ; दोघांचा मृत्यू ; तीनजण जखमी
सायन येथून दादारकडे जाणाऱ्या एका कारने सोमवारी पहाटेच्या सुमारास सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हॉटेल गंगा विहार समोरील डिव्हायडरला अचानक धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाने तातडीने सायन रूग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी दोघांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
___________________________________________________________
मंत्रालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक सुरू
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू करण्यात आली आहे.
_____________________________________________________________
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी होणार; राज्य शासनाकडे प्रस्ताव
राज्य शासनाकडे मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.
—————————————————————————————-
अपात्रता प्रकरणातील मोठी अपडेट: सर्व आमदारांची एकाच दिवशी होणार सुनावणी
14 सप्टेंबरला तब्बल 34 याचिकांवर अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत.
—————————————————————————————–
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक होणार, तर एसटी कामगार संघटनेकडून एकदिवसीय उपोषणाची हाक
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवार गटाकडून राजेश टोपे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.
————————————————————————————————–
आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकराचे दर्शन घेणार आहेत.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे
साताऱ्यात कराडमध्ये दोन गटांत जोरदार राडा
मंगळवार पेठेत पोलिसांसमोरच दोन गटांतील तरुणांमध्ये हाणामारी
_______________________________________________________________________