अंधेरीमध्ये गोदामाला आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी
अंधेरी पश्चिमकडील वीरा देसाई रोड अंधेरी चित्रकूट मैदानावर एका गोदामाला आग लागली
आग आटोक्यात आली असून यामध्ये कोणही जखमी झाले नाही
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सध्या सुरू
उपमुख्यमंत्री अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीसाठी दाखल
पुण्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू
पुण्यातील सीमा फार्म्स रिसॉर्टवर आलेल्या बापलेकीचा धबधब्यात खेळताना मृत्यू
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिसॉर्ट बांधण्याची माहिती
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ
उत्तर देण्यासाठी शरद पवार गटाला 8 सप्टेंबरपर्यंतची मुदत
अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करताना पक्षावर दावा केला होता, त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली होती
राज ठाकरेंनी पक्षविस्तारावर न बोललेलंच बरं – आशिष शेलार
अनिल देशमुख यांनी घेतली नवाब मलिक यांची भेट
तब्येतीची चौकशी केली, राजकीय चर्चा झालेली नाही अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली
नवाब मलिक यांच्या भेटीवेळी अनिल देशमुख यांच्यासोबत विद्या चव्हाणही उपस्थित होत्या
समाजात कटुता कशी वाढेल हीच भाजपाची भूमिका – शरद पवार
मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न
अनेक दिवसांपासून राज्याचा दौरा सुरु असून राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
उद्या बीडमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
मुंबई – गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहाणी
मुंबई – गोवा महामार्गासाठी असे आंदोलन करा की शासन – प्रशासनामध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे
राज ठाकरे पनवेलमध्ये मेळाव्याच्या ठिकाणी दाखल
कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत
कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
भूंकपामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरणं
सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी
अटलींच्या स्मृतिस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल
वायपेयींना श्रद्धांजली देण्यासाठी मोदी उपस्थित
राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, विनोद तावडेही उपस्थित
डहाणू लोकल आज अशत: रद्द
डहाणू रोड रेल्वे स्थानकात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आज ब्लॉक
चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द