Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळवा रुग्णालयाचा भेट परिस्थितीचा...

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळवा रुग्णालयाचा भेट परिस्थितीचा आढावा घेतला

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळवा रुग्णालयाचा भेट परिस्थितीचा आढावा घेतला

छत्रपती शिवाजी रुग्णालयात झालेले 18 मृत्यू कोणत्या कारणाने आणि कोणत्या परिस्थितीत झाले याची माहिती त्यांनी घेतली. तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

- Advertisement -

यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदल, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. माळेगावकर, इत्यादी अधिकारी उपस्थित होते


 

- Advertisement -

नवाब मलिक क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून नवाब मलिकाचं जोरदार स्वागत


मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या कोविड लसीकरण बंद

उद्या मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्रदिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने कोविड लसीकरण बंद असणार आहे

बुधवार, दिनांक 16 ऑगस्ट 2023 पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार

मुंबईकर नागरिकांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्‍यात आले आहे


अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष नवाब मलिकांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिकांना भेटण्यासाठी दाखल झाले


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी मंत्रालय प्रांगणात करणार ध्वजारोहन


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या उद्या सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर करणार ध्वजारोहन

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, ए-5 – प्रतापगड मादाम कामा रोड, मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट मुंबई येथे करणार ध्वजारोहन


स्वातंत्रदिनानिमित्त चिफ ऑफ आर्मी स्टाफला प्रशस्तीपत्रक होणार प्रदान

चिफ ऑफ आर्मी स्टाफ 21 आणि व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ 14 अशा एकूण 35 स्टाफला होणार प्रशस्तीपत्रक प्रदान


नवाब मलिक थोड्याच वेळात क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर येणार

त्यांच्या स्वागतासाठी रुग्णालयाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळे उपस्थित आहेत


नूह जिल्ह्यात 13 दिवसांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत

31 जुलै रोजी शोभा यात्रेदरम्यान नूह येथे झालेल्या हिंसाचारानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 


आयुक्त कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन; 18 जणांच्या मृत्यूवर मनसे आक्रमक

कळवा, ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मनसेचं आंदोलन


शिमला बाळूगंजजवळ दरड कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 20-25 जण अडकल्याची भीती

शिमला बाळूगंजजवळ शिवमंदिराजवळ दरड कोसळली.

घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात


मनसेची बैठक सुरू; राज ठाकरे उपस्थित


कोल्हापूरसह इचलकरंजीत NIA ची छापेमारी, तीन संशयित ताब्यात


भाजप आज फाळणी वेदना दिवस पाळणार, ठिकठिकाणी कार्यक्रम

- Advertisment -