घरदेश-विदेशLive Update : राजभवन येथील गणरायचे विधिवत विसर्जन

Live Update : राजभवन येथील गणरायचे विधिवत विसर्जन

Subscribe

राजभवन येथील गणरायचे विधिवत विसर्जन

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे 5 दिवसांसाठी बसवण्यात आलेल्या गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

राज्यपालांच्या हस्ते श्रीगणेशाची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजभवनाच्या समुद्रकिनाऱ्यावर गणरायाचे विसर्जन केले


10 हजार घरात पुराचं पाणी शिरले, आतापर्यंत 2 मृत्यू – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

नागपूरमध्ये घरात पाणी शिरलेल्या कुटुंबीयांना 10 हजार रुपयांची मदत

दुकानाचं नुकसान झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत देणार


छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल – प्रकाश आंबेडकर

रायपूर दौऱ्यावर असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली आहे.


मुजोर भाजपा खासदार रमेश बिधुरींना तात्काळ निलंबत करा – नसीम खान

माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.


मुबंई विद्यापीठाच्या कार्यक्रमात अजित पवार गैरहजर

निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही अजित पवार गैरहजर


उल्हासनगर जवळील शहाड सेंचुरी रेऑन कंपनीत स्फोट; दोन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

स्थानिक पोलिसांकडून स्फोटाप्रकरणी अधिक तपास सुरू


गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात हमसफर एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागली

आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस, सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


अमित शाहा उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी दाखल


अमित शाहा वर्षा निवासस्थानी दाखल; बाप्पाचे घेतले दर्शन


अमित शहा यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

सोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत.

——————————————————————————————

अमित शहा मुंबईत दाखल; आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं घेतलं दर्शन

अमित शहा वांद्र परिसरात,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पांचंही घेणार दर्शन . तसंच शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनालाही जाणार आहेत.

——————————————————————————————

आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन

दादरमधील हिंदू कॉलनी परिसरातील रेनट्री इमारतीच्या 13 व्या मजल्याला आग; एकाचा मृत्यू

आगीत 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ही इमारत 15 मजली आहे. त्यातील 13 व्या मजल्यावर आग लागली आहे.


संसदेत मुस्लिम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस खासदार गप्प का होते?

लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेसचे खासदार गप्प होते असं म्हणत त्यांनी काँग्रेस खासदार गप्प का होते असा प्रश्न विचारला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा आरोप केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत एका भाजप खासदाराने मुस्लीम खासदारासाठी भडवा, कटवा (खंता झालेला), मुल्ला दहशतवादी आणि कट्टरवादी अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अपमान केला. मला आश्चर्य वाटते की, विरोधी बाकावरील एका मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस खासदार काय करत होते?”

—————————————————————————————–

अमित शहा आज लालबागमध्ये

वर्षावर जाणार तसंच फडणवीसांच्या गणपतीचीही घेणार भेट

———————————————————————————————–

one nation one election साठी बनवलेल्या कमिटीची आज बैठक

समितीत कोण?

लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्यावर शिफारशी करण्यासाठी आठ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती. रामनाथ कोविंद यांना अध्यक्ष करण्यात आले आहे.

समितीचे सदस्य गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि एनके सिंग आहेत. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे देखील या समितीचे सदस्य होते, परंतु त्यांनी अलीकडेच शहा यांना लिहिलेल्या पत्रात समितीचा भाग होण्यास नकार दिला.

याशिवाय ज्येष्ठ वकील हरीश साळवे, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि संजय कोठारी यांचाही समितीत समावेश आहे.

———————————————————————-

नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती; घराघरांत साचलं पाणी

नागपुरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली आहे. प्रचंड पावसामुळे नागपुरात महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतीतही पाणीची पाणी झाल्यानं शेतीची वाट लागली आहे. एसटी स्टँडमध्ये पाच फुटापर्यंत पाणी भरल्यानं एसटी पाण्यात बुडाल्या आहेत. या महापुरामुळे नागपूरकर हवालदिल झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -