Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : कसबापेठचा विजय महाविकास आघाडीचा नाही : देवेंद्र फडणवीस

Live Update : कसबापेठचा विजय महाविकास आघाडीचा नाही : देवेंद्र फडणवीस

Subscribe

कसबापेठचा विजय महाविकास आघाडीचा नाही : देवेंद्र फडणवीस


नागालॅंडमध्ये सत्तेत वाटा मागणार : रामदास आठवले


- Advertisement -

पालघरमधील जव्हारमध्ये गोखले महाविद्यालयाच्या आवारात लागली आग

बारावीची परीक्षा सुरु असताना घडली घटना

- Advertisement -

आगीच्या भीतीने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही झाली पळापळ


चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ३६ हजार ७० मतांनी विजयी


हाथरस हत्याकांडाप्रकरणी आरोपी संदीपला जन्मठेपेची शिक्षा


नागालँडमधील निवडणुकीत आरपीआय आठवले गटाचा दोन जागांवर विजय


कसबा पेठ विजयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. जनमताचा हा कौल भाजप विरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत. काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली.

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि विजयासाठी परिश्रम घेणार्‍या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मतदारांचे आभार.


भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल

कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी

भाजपचे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरवून देखील हेमंत रासने यांचा पराभव

२८ वर्षानंतर कसब्यातील भाजपचा बालेकिल्ला ढासळला.


मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी समिती गठीत होणार

निवडणूक आयोगासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश असणार


कसब्यात भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर, भाजपच्या बालेकिल्ल्यात रविंद्र धंगेकर आघाडीवर

आश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर आघाडीवर

सहाव्या फेरीअखेर चिंचवडमधून अश्वीनी जगताप आघाडीवर

सातव्या फेरीत कसब्यातून रविंद्र धंगरेकर आघाडीवर


अभिजीत बिचुकलेला कसबा पेठेतून चार मते

कसब्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तिसऱ्या फेरीत आघाडीवर


पुण्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात, अश्विनी जगताप आघाडीवर


ईशान्येच्या तीन राज्यांत आज मतमोजणी, कमळ फुलणार की काँग्रेस जिंकणार?

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार

त्रिपुरात ८८ टक्के, मेघालयात ७६ टक्के तर नागालँडमध्ये ८४ टक्के मतदान


 

- Advertisment -