घरदेश-विदेशLive Update : ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून राडा; शिवसेना-ठाकरे कार्यकर्ते भिडले

Live Update : ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून राडा; शिवसेना-ठाकरे कार्यकर्ते भिडले

Subscribe

मुंबई आणि नागपूरमध्ये ईडीकडून १५ ठिकाणी करण्यात आली छापेमारी

छापेमारीमध्ये ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि कोटी रुपयांची रोकड जप्त

- Advertisement -

पुण्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीची हत्या

वेल्हे तालुक्यातील घटना

- Advertisement -

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणुसे असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव


नायर रुग्णालयात स्लॅब कोसळून ४ जण जखमी

नायर रुग्णालयामध्ये सिलिंग प्लास्टर कोसळले

दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश

मध्यरात्री अडीच वाजताची घटना


१०० वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमांना संपवणार नाहीत – रामदास कदम

खेडचा विकास मी केला, हे ठाकरेंना माहितेय

योगेश कदमांना हरवू शकत नाही

कालच्या सभेत खेडची किती लोक होते

उद्धवजी तुमचा चेहरा भोळा दिसतो, पण भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे हे मी पाहिलंय

…तर तुमच्या घरी मी भांडी घासेन, नाहीतर तुम्ही याल का?

ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण तो रामभक्त

तुमच्या हातात धनुष्यबाण येईल कसा, तुमचे हात बरबटले आहेत

उद्धव ठाकरेंच्या सभेतून लोक उठून जात होते

ठाकरेंच्या सभेला, मुंबई ठाण्याहून लोक आणली

ज्याला काविळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते

एकजरी आमदार दाखवा पैसे घेतले, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला

तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिले असते का

हा प्रश्न शेंबड्या मुलाला विचारला तरी तो नाही म्हणेल

सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य केलं, मुख्यमंत्री बननण्यासाठी तुम्ही वडिलांसोबत बेईमानी केली

खेडला येऊन चूक केलीत


प्रोजेक्ट केच्या शुटींगदरम्यान बिग बी जखमी, ब्लॉगमधून दिली अपघाताची माहिती


कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला – संजय राऊत

शिवसेना नाव आणि चिन्ह चोरलं असली तरी कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूला आहे. खोक्याने विकत घेतलेली जनता काल नव्हती. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला. आता तुम्ही आव्हान सभा वगैरे घेतल्या तरी काही खोक्याचं राजकारण आहे. कोकण आणि शिवसेना अतुट नातं आहे काल दिसलं. जनतेची मन काबिज करण्याची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णय़ावर जनता किती संतप्त आणि चिडलेली आहे. जी भूमिका काल ठाकरेंनी मांडली, शिवसेना हा निवडणूक आयोगाच्या बापाची नाही. जनतेची आहे. जनतेचा महासागर खेडच्या मैदानात उसळला होता. मिंधे गटाला भाजपा स्क्रिप्ट लिहून देतं. आम्ही अजिबात शिमगा करत नाही. आम्हाला शिमगा करण्याची गरज नाही. जनता आपोआप त्यांचा शिमगा करणार.


धनशक्तीला लोक जुमानत नाहीत हे सिद्ध झालं

बदलासाठी सर्व पक्षीयांना एकत्र यावंच लागेल

लोकांना बदल हवाय हे स्पष्ट

बापटांचे सर्वपक्षीयांशी संबंध आहेत

आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत काळजी घेतली जाईल

शरद पवार कसब्याचे नवनिर्वाचित आमदार धंगेकरांच्या भेटीला

धंगेकरांच्या विजयाबद्दल मला खात्री नव्हती – शरद पवार


पुण्यात पीएमपीएल ठेकेदारांचा संप

चार ठेकेदारांच्या संपामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधातील ट्वीट भोवले, एकावर गुन्हा दाखल

मुंबईच्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल


आज देशभर सर्वत्र होळीचा उत्साह

होळीच्या दिवशी पावसाची हजेरी, पालघरसह अनेक ठिकाणी पाऊस

हेही वाचा – Holi 2023 : पुढचे 8 दिवस होलाष्टकात करू नका ‘या’ गोष्टी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -