Live Update : एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर


खच्चून जाऊ नका, विजय आपलाच आहे- उद्धव ठाकरे


रात्री साडेवाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद


एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळालं : निवडणूक आयोग


बीबीसीकडून कर चोरीची शक्यता : प्राप्तिकर विभाग


मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू


जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्वी जामीन मंजूर

ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहेर मारहाण प्रकरण


मनसुख हिरेन प्रकरणात सुनील माने माफीचा साक्षीदार होण्यास तयार

कोर्टाकडे केला अर्ज


महेश अहेर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन दिवसांची म्हणजेच २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी


ठाकरे गटाकडून वेळकाढू धोरण- देवेंद्र फडणवीस

सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी संयुक्तिक नाही

उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढू करण्यासाठी सात न्यायमूर्ती घटनापीठाची मागणी करतेय

जो काही निर्णय मिळालाय त्यावर समाधानी


लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जाणं हे गंभीर- संजय राऊत

संजय राऊत आज रत्नागिरी दौऱ्यावर

यामागे राजकीय षडयंत्र

तपास निःपक्षपातीपणे होईल का याबाबत शंका

सरकारच्या एसआयटीमध्ये ११ अधिकारी कोण आहेत- राऊत

हत्येच्या ठिकाणचे तिन्ही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे

प्रत्यक्षदर्शींवर जबाब देण्यासाठी दबाव


ठाकरे गटाची कायदेशीर बाजू कमकुवत : खासदार राहुल शेवाळे

– पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सदर प्रकरणाची नियमित सुनावणी 21 फेब्रुवारीपासून घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

– महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सूनावणीवर लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा, ही महाराष्ट्रातील जनतेची आणि आमची देखील मागणी आहे. मात्र, हा निर्णय लांबणीवर जाण्यासाठी विरोधकांकडून विविध प्रकारचे अडथळे निर्माण केले जात आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण नेण्याची विरोधकांची मागणी देखील याच प्रयत्नाचा भाग आहे.

– विरोधकांची बाजू कायदेशीर दृष्टया तकलादू असल्याने त्यांचा प्रत्येक वेळी न्यायालयात वेळकाढूपणा सुरू आहे. मात्र, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सलग सुनावणी घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय म्हणजे विरोधकांच्या खोटारडेपणाला चपराक आहे.

– विरोधकांचा न्यायालय, निवडणूक आयोग आणि लोकशाहीवर देखील विश्वास नाही.

– महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनेनुसार स्थापन करण्यात आलेलं कायदेशीर सरकार असून सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सूनावणीबाबत लवकर निर्णय व्हावा, ही आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे.

– नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ घेण्यासाठी विरोधक हरकत घेत आहेत. मात्र, आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत नाबाम रेबीया प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. ही दुटप्पी भूमिका आहे


सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार नाही, पुढची सुनावणी २१ फेब्रुवारीला

पुढची सुनावणी २१ आणि फेब्रुवारीला होणार

सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन

कोणत्याही क्षणी सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू होणार


संजय राऊत, अंबादास दानवे आज रत्नागिरीत

पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरणी कोकण दौरा


जम्मू काश्मीरच्या काटरामध्ये भूंकपाचे धक्के

सकाळी ५.०१ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलवर भूकंप जाणवला

१० किमी अंतरावर भूकंपाची खोली


मध्य प्रदेशातील रूद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी; बुलढाणा, अकोल्याच्या महिला बेपत्ता

महिलांशी संपर्क होत नसल्याने गोंधळ

खामगाव पोलिसांत तक्रार