Live Assembly Budget 2023 : विधानसभेच्या दुस-या दिवसाचे कामकाज संपले

maharashtra assembly budget 2023-24

अमित साटम आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये विधानसभेत खडाजंगी

कोविडच्या पहिल्या लाटेतील मंत्र्यांचे काम करतानाचे फोटो आणून दाखवण्याचे अमित साटम यांचे वायकरांना आव्हान


महाराष्ट्र एकीकरण समितीच शिष्टमंडळ विधान भवनात दाखल

मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील हे एकीकरण समितीच्या सदस्यांना भेटून विधानभवन येथे घेऊन आले आहेत

थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार आहे


विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून राज्यपालांच्या अभिभषणावर समर्थन


विधान परिषदेचं दिवसभरासाठी कामकाज तहकूब


कुष्ठरोग्यांना अंपगत्वाचा दाखला द्या – जितेंद्र आव्हाड

२०२२-२३ मध्ये व्यापक प्रमाणात कुष्ठरोग शोध उपचार मोहिम राबवण्यासाठी ६० हजार टीम नेमल्या. त्या टीमकडून गावोगावी, गल्लीत, सोसायटीतून सर्वेक्षण केलं. आशा वर्करना प्रशिक्षण दिलं की कुष्ठरोग रुग्ण कसे शोधावेत. औषधं उपलब्ध करून द्या. एकूण सर्वेक्षणातून ८ कोटी ६६ लाख लोकांचं सर्वेक्षण केलं. त्यातून तीन लाख ६७ हजार ३७७ एवढे संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी ६ हजार ७३१ कुष्ठरोग बाधित सापडले. त्यांच्यासाठी बहुविध उपचार पद्धती सुरू केले.
२०२७ पर्यंत कुष्ठरोग निर्मुलन उपक्रम दिला आहे. कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या उपजीविकेसाठी समिती स्थापन करणार.

शिवसेनेच्या संपवण्याच्या डावात मुंबई पालिका आयुक्त सहभागी झाले का? – जितेंद्र आव्हाड


विधान परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब


* शिक्षकांच्या संपामुळे बारावीच्या परीक्षांच्या ५० लाख उत्तरपत्रिका तपासाविना पडून
* बारावीचा निकाल वेळेवर लागला नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल
– आमदार आशिष शेलार, भाजपा


एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
* आतापर्यंत फक्त घोषणा होत होत्या, परंतु देण्याचं काम युतीच्या सरकारने केलंय.
* मी फक्त बोलत नाही, तर देतो सुद्धा. हे सरकार दोन्ही हाताने सढळ हस्ताने देणारं आहे, घेणारं नाही.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


धारशिव : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भुम मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा पंचनामा
आरोग्य यंत्रणेचा छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून पंचनामा
भुम येथील ग्रामीण रुग्णालयाला संभाजी महाराज यांनी दिली भेट
रुग्णालयात डॉक्टर, नर्स याची कमतरता असुन अनेक ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य, अनेक मशीन बंद असुन धुळखात पडल्या


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ

सभागृहात विरोधकांकडून घोषणाबाजी

कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. तुमच्याकडे वेगळी माहिती असेल तर त्यांनी हक्कभंग आणावा – देवेंद्र फडणवीस

निर्यातीवर बंदी नाही, नाफेडची खरेदी सुरू झाली आहे – एकनाथ शिंदे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अजित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक

कांदा उत्पादक शेतकरी गरीब वर्गातील शेतकरी- छगन भुजबळ

कांदा निर्यात वाढली तर किंमत वाढेल

कांदा निर्यातीत सातत्य नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा उत्पादक तोट्यात – छगन भुजबळ

नाफेडनं कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर नियंत्रणात राहतील


कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

कांद्याची माळ आणि डोक्यावर टोपलीतून कांदे आणत विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन