Live Update : उद्धव ठाकरे राजभवनाकडे रवाना

Maharashtra Breaking News

उद्धव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा राजीनामा

मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे – उद्धव ठाकरे

शिवसैनिकांनी कुठलाही गोंधळ घालू नये – उद्धव ठाकरे

संख्याबळाचा खेळच खेळायचा नाही – उद्धव ठाकरे

शिवसैनिकांनी उद्या सर्व बंडखोर आमदारांना येऊ द्यावे – उद्धव ठाकरे

आवाहन करूनही गुवाहटीला गेलेले आमदार परत आले नाही – उद्धव ठाकरे

मला आजही तुमचा आदर आहे, जे काही असेल ते समोर येऊन बोला – उद्धव ठाकरे

लोकशाहीचा मान राखल्याबाबत राज्यपालांचे आभार – उद्धव ठाकरे

विरोधकांनी पत्र देताच २४ तासांच बहुमताच्या चाचणीचा निर्णय दिला – उद्धव ठाकरे

ज्यांना काही मिळाले नाही ते आज हिंमतीने सोबत – उद्धव ठाकरे

ज्यांना आजपर्यंत सर्व दिले तेच नाराज झाले – उद्धव ठाकरे

रिक्षावाले, पानपट्टीवाल्यांना मंत्री केले – उद्धव ठाकरे

लहानपणापासून शिवसेना आजमावतोय – उद्धव ठाकरे

आज मंत्रिमंडळात शिवसेनेचे चारच मंत्री होते याचे दु:ख – उद्धव ठाकरे

शिवसेनेला आज ५६ वर्षे झाली – उद्धव ठाकरे

पवार आणि सोनिया गांधींनी आतापर्यंत सहकार्य केले – उद्धव ठाकरे

चांगले सुरू असलेल्य कामाला दृष्ट लागते – उद्धव ठाकरे

माझ्या कामाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना निधी देऊन झाली – उद्धव ठाकरे

औरंगाबाग आणि उस्मानाबादचे नामांतर केले – उद्धव ठाकरे

पुढची वाटचाल सर्वांच्या आशिर्वादाने सुरू राहिल – उद्धव ठाकरे


मुख्यमंत्री थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार


अनिल परब राजभवनाकडे रवाना


उद्या सकाळी ११ वाजता बहुमताची चाचणी होणार

उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


बहुमत चाचणीवर रात्री ९ वाजता लागणार निकाल

सुप्रिम कोर्टातील युक्तीवाद संपला


राज्यपालांचे वकील मणिंदर सिंह यांचा युक्तिवाद

मणिंदर सिंह- बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना कुणाच्याही सूचनेची गरज नाही.

मणिंदर सिंह – बहुमत चाचणी बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार आहे.


आम्हीच शिवसेना आहोत, एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

नीरज कौल – राजकीय नैतिकतेसाठी बहुमत चाचणी गरजेची

कोर्ट- बंडखोर गटात किती आमदार आहेत

नीरज कौल – माहितीनुसार 55 पैकी 39 आमदार बंडखोर गटात आहे.

कोर्ट- किती जणांना अपात्रतेची नोटीस

नीरज कौल- 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस आहे.

नीरज कौल – शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही.

नीरज कौल- हा गटच शिवसेना आहे, यांच्याकडे बहुमत आहे. 9 अपक्ष आमदारांचेही समर्थन आहे.

नीरज कौल – पक्षातील केवळ 14 आमदार आम्हाला विरोध करीत आहेत.


मला माझ्याच काहीच लकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे.

सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला


नीरज कौल- राज्यात 2020 मध्ये बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला होता.

नीरज कौल- बहुमत चाचणी तत्काळ व्हायलाच हवी

नीरज कौल – आधी बहुमत चाचणी आधी घ्या, मग बाकीचे निर्णय घ्या

नीरज कौल- लोकशाहीत बहुमत चाचणीसाठी विधिमंडळापेक्षा दुसरी जागा आहे का?

नीरज कौल – बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्ष कोर्टात येतात, इथे मात्र दुसरीच परिस्थिती आहे.

नीरज कौल- कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं असताना बहुमत चाचणीला विरोध का

नीरज कौल- राज्यपालांनी घेतले निकाल हा योग्य आहे. सध्याची स्थिती पाहता तो योग्यच म्हणायला हवा

नीरज कौल- चाचणीला उशीर केल्यास घटनेला अधिक धक्का बसेल


कोर्ट – बहुमत चाचणीत कोण कोण येऊ शकेल?

नीरज कौल – अल्पमतातील सरकार सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतंय. मुख्यमंत्री बहुमत चाचणीपासून वाचण्याचा प्रयत्न का करतायेत.


औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता


उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.


राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.


कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार


अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार


पुण्याचे नाव जिजाऊनगर करा, कॅबिनेच बैठकीत कॉंग्रेसची मागणी


राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला


शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.


राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला
राज्यपालांनी घाई केली
विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर घेतला निर्णय
पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याने 16 आमदार अपात्र
प्रकरण SC मध्ये प्रलंबित असताना मजला चाचणी चुकीची


सिंघवी – या आमदाराला २१ जून रोजीच अपात्र ठरवण्यात आले आहे.


न्यायाधीश- आजवर वक्त्याने हाच निर्णय घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती.


न्यायाधीश फ्लोर टेस्ट कधी करू शकतात याबाबत काही नियम आहे का?


महाराष्ट्र प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू


सिंघवी- फ्लोर टेस्ट ही बहुमत जाणून घेण्यासाठी असते. यामध्ये कोण मतदान करण्यास पात्र आहे आणि कोण नाही याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

सिंघवी- सभापतींच्या निर्णयापूर्वी मतदान होऊ नये. त्यांच्या निर्णयानंतर सभागृहाच्या सदस्य संख्येत बदल होणार आहे.

सिंघवी- न्यायालयाने अपात्रतेच्या मुद्द्यावरची सुनावणी 11 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. त्याआधी फ्लोर टेस्ट चुकीची


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना

६ ऑगस्टला होणार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याच्या दिशेने रवाना


गोवा विमानतळावर सुरक्षा यंत्रणेत वाढ

फ्लोअर टेस्टमध्ये राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार
माजी आमदार विजय शिवतारे यांचाही शिंदे गटाला पाठिंबा
एकनाथ शिंदे उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार
राष्ट्रवादीच्या आमदारांना ट्रायडंटमध्ये ठेवणार
————————
कामाख्या देवीचं दर्शन घेऊन बंडखोर आमदार रवाना

रेडिसन हॉटेलमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला
———————————————————————————–
महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट
———————————————
एकनाथ शिंदेंकडून आसामला ५१ लाखांची मदत जाहीर
शिवसेनेच्या याचिकेवर सायंकाळी सहा वाजता सुनावणी

सिल्व्हर ओकवरील बैठक संपली, शिवसेनेचे नेते गैरहजर


शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू सर्वोच्च न्यायालयात


सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीतून गोव्याला जाणार


शरद पवारांच्या निवासस्थानी आज सकाळी १० वाजता बैठक


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्वर ओकवर दाखल


महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत


उद्या मुंबईत येऊन फ्लोअर टेस्ट करणार – एकनाथ शिंदे


राज्यपालांकडून मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र


एकनाथ शिंदे गुवाहाटीतल कामाख्या मंदिरात पोहोचले


एकनाथ शिंदे हॉटेल रेडिसनमधून निघाले


तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागली असून या आगीत सलग आठ मोठे स्फोट झाले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
———–