घरदेश-विदेशLive Update : मुंबई सत्र न्यायालयात मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात याचिका दाखल

Live Update : मुंबई सत्र न्यायालयात मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात याचिका दाखल

Subscribe

मुंबई सत्र न्यायालयात मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात याचिका दाखल

भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळेंची याचिका

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मंगळवारी या याचिकेवर होणार सुनावणी

- Advertisement -

पुण्यातील शिरूरमधील एआयएम कंपनीत आग


घाटकोपरच्या पारेख रुग्णालयाच्या इमारतीतील हॉटेलमध्ये आग

रुग्णालयात अनेकजण अडकल्याची माहिती


ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान राहुल गांधींनी केला तेव्हा त्यावेळी मोर्चा का नाही काढला? ते मोठे नाहीत का? केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय – देवेंद्र फडणवीस

आपण आज तीन पक्ष विसरले आहेत की कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही हा वाद ६० वर्षे आहे. वारंवार ज्यांनी राज्य केलं त्यांनी काहीही केलं नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमचे श्रद्धास्थान कालही होते, आजही राहणार. उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथेच अडकली आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. हे माहित असताना किती दिवस तेच तेच बोलणार. एकही नवीन मुद्दा नाही. केवळ शिवराळ भाषा वापरावी. काहीतरी नवीन, काहीतरी एकण्यासारखं ते बोलतील एवढी माफक अपेक्षा आहे.

ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही त्यांच्या नाकाखाली टिच्चून सरकार स्थापन केलं.

ड्रोन शॉट लायक हा मोर्चा नव्हता. आझाद मैदानावर गर्दी दिसणार नाही, म्हणून जिथे निमुळता रस्ता तिथे त्यांनी मोर्चा घेतला. त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसाच त्यांचा विचार आहे.


आईच्या पाठीत नाही तर कुशीत वार केला, ठाकरेंचा शिंदेवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेंसह अनेक नेते सभास्थळी दाखल

तेजस ठाकरेही सभास्थळी पोहोचले

सभास्थळांवरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाषणे सुरू

कार्यकर्त्यांच्या हातात महापुरुषांचे फलक

महामोर्चात समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते दाखल

काँग्रेस नेतेही सहभागी

उद्धव ठाकरे महामोर्चात सहभागी, आदित्य-रश्मी ठाकरेही सामील

रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकरसुद्धा महामोर्चात सहभागी

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात

फलक-झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी

अजित पवार दाखल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, तटकरे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात मोर्चात सहभागी


उद्धव ठाकरे मोर्चासाठी रवाना


मविआ नेत्यांची सेंट्रल हॉलमध्ये बैठक सुरू

अजित पवार दाखल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, तटकरे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात बैठकीला हजर


दोषींच्या मुक्ततेविरोधात केलेली बिल्किस बानोची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


सांताक्रुझमध्ये काल नोंदवले ३५.६ अंश सेल्सिअस तापमान

देशातील सर्वाधिक तामपान सांताक्रूझमध्ये


आफताबच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी

श्रद्धा हत्याप्रकरणात न्यायलयीन कोठडीत असलेल्या आफताब पुनावाला याने दिल्ली हायकोर्टात जामीनासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली

या याचिकेवर आज सुनावणी होणार


ठाणे बंद पुकारल्याने परिवहनची वाहतूकही बंद

आज सकाळपासून ठाणे परिवहनची एकही बस बाहेर पडली नाही तर रिक्षा मध्यम स्वरूपात सुरू.


आज महाविकास आघाडीचा महामोर्चा तर, भाजपाकडून माफी मांगो आंदोलन

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी वादळी ठरणार आहे. कारण, महापुरुषांच्या अपमानप्रकरणी महाविकास आघाडीने आज सरकारविरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे. तर, महाविकास आघाडीला टफ फाइट देण्याकरता भाजपाकडून माफी मांगो आंदोलन पुकारण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा भायखळा येथून सुरुवात होईल, तर भाजपाचे आंदोलन दादर स्थानक पश्चिमेला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -