Live Update : सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का

ठाकरेंचे निकटवर्तीय भूषण देसाई करणार शिंदे गटात प्रवेश

देसाई उद्योग मंत्री असताना उद्योग खात्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप


मुंबईच्या मालाड पूर्वेच्या झोपडपट्टीला भीषण आग

मालाडच्या आप्पा पाडा झोपडपट्टीला लागली आग


राजभवनाकडे जाणारा काँग्रेसचा भव्य मोर्चा पोलिसांनी रोखला

शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर

काँग्रेसचे अनेक नेते झाले मार्च्यामध्ये सहभागी

अदानी समुहाच्या घोटाळ्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी शीतल म्हात्रेंविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात देणार निवेदन

शितल म्हात्रे यांच्या विरोधात आज सायंकाळी 4 वाजता देण्यात येणार निवेदन


आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक

साईनाथ दुर्गे युवासेना कार्यकारिणीचे आहेत सदस्य

शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ माफ केल्याप्रकरणी घेण्यात आले ताब्यात

दहिसर पोलिसांनी विमानतळावरून साईनाथ दुर्गेंना घेतले ताब्यात


जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक

राज्य सरकार योजनेबाबत समिती नेमणार

शासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार


आमदार बच्चू कडूंच्या मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी ढकलली पुढे

मरीन ड्राइव्ह परिसरात बच्चू कडू यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता गुन्हा


नाशिकमधील आंदोलक शेतकरी उद्या मुख्यामंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार

उद्या दुपारी ३ वाजता घेण्यात येणार बैठक


सीएम म्हणजे करप्ट मॅन, फडणवीस पक्षपात करत नाहीत- संजय राऊत

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी – संजय राऊत


समलैंगिक विवाहाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार

आरआरआर चित्रपटाने रचला इतिहास


आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांचा काँग्रेसला राजीनामा

किरण कुमार रेड्डी भाजपा हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती


विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शेतकऱ्यांचे लाल वादळ आज मुंबईत

मागील अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढणार आहेत. दिंडोरीमधून हा लॉन्ग मार्च निघाला. विशेष म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे.


हसन मुश्रीफ यांची आज चौकशी


ऑस्करमध्ये The Elephant Whisperers ठरला सर्वोत्तम माहितीपट

भारतीय माहितीपट The Elephant Whisperers ठरला सर्वोत्तम माहितीपट


कथित अदानी घोटाळ्याविरोधात काँग्रेस आज राजभवनला घेराव घालणार

उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्ष पुन्हा आक्रमक झाला आहे. अदानी समूहाच्या महाघोटाळ्याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार मौन पाळून असल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या आज आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घालण्यात येणार आहे.