Live Update : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SRA प्रकरणात किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल

वांद्र्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी विजेत्यांना 15 हजार मानधन; देवेद्र फडणवीसांची घोषणा

कुस्ती खेळाडूंना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी देण्याची देवेद्र फडणवीसांची घोषणा


ओडिशातील मकर सक्रांतीच्या मेळाव्यात चेंगराचेंगरी; 2 जणांचा मृत्यू


माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव पंचतत्वात विलीन


महाराष्ट्र केसरी माती विभागातील लढतीत महेंद्र गायकवाढ विजयी


शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल

फी न भरल्याने 8 वर्षीय मुलीचा अपमान आणि शिक्षा केल्याच्या आरोपाखाली दादर पोलिसांकडून एफआयआर दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा रद्द


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी


कोल्हापूरमध्ये रासायनिक कंपनीला आग

कोल्हापूरमध्ये गोकूळ शिरगाव परिसरातील घटना


महाविकास आघाडीचा नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा

शुभांगी पाटील महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून लढणार


नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी

नागपूरमधील कार्यालयात तीनवेळा धमकी फोन

नागपूर कार्यालयाच्या बाहेर सुरक्षेत वाढ


भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीतचा अपघाती मृत्यू

रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराईजवळ अपघात


ड्रग्जविरोधी मोठी मोहीम सुरू करणार – देवेंद्र फडणवीस

गुन्हे आणि सुरक्षा परिषदेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

सायबर क्राइम कमी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले जातील

सायबर कायद्यात बदल अपेक्षित


लोकसभेत राष्ट्रवादीची सदस्यसंख्या घटली

राष्ट्रवादीच खासदार मोहम्मद फैजल यांना केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने हत्येच्या प्रयत्नेप्रकरणी दोषी ठरवले

११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले


तांबे कुटुंबीयांबाबत मविआची बैठक

मातोश्रीवर महाविकास आघाडीतील अनेक नेते हजर


काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

भारत जोडो यात्रेत अचानक तब्येत बिघडली

विर्क रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू

प्रकृती खालावल्यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवली


विरोधक असतानाही मविआत समन्वय हवा – संजय राऊत

तांबे कुटुंबीय काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब


पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली

श्वान पथक दाखल


उर्फी जावेदची आज होणार चौकशी, चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांकडून दखल


18 तासानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे


पुण्यात एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक आत्महत्या


हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, 3.2 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप