Homeदेश-विदेशLive Update : पुणे सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर

Live Update : पुणे सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर

Subscribe

पुणे सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर

सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी राहुल गांधींनी जामीन मंजूर

- Advertisement -

10/1/2025 17:34:29


टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

- Advertisement -

घोटाळ्यातील साक्षीदाराकडून याचिका दाखल

घोटाळ्याचा तपास स्टेट सीआयडी किंवा एसआयटीद्वारे करण्याची साक्षीदाराची मागणी

10/1/2025 17:22:9


भिवंडीतील ओवळी भागात भंगाराच्या गोदामांना आग

भंगाराच्या चार ते पाच गोदामांना आग

आगीत गोदामातील साहित्य भस्मसात

10/1/2025 17:4:31


बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण

बाळासाहेबांनी जीवनात काय घडवलं याचं दर्शन होणार – आदित्य ठाकरे

एकही झाड न तोडता स्मारकाचं काम

अनेक महत्त्वाचे निर्णय बाळासाहेबांनी या वास्तूमधून घेतले

——–

महापौर बंगल्याचं वैभव जपून स्मारक उभारले – उद्धव ठाकरे

बाजूला समुद्र असल्यामुळे भूमिगत वास्तू उभारणं जिकरीचं काम

बाळासाहेबांच्या अनेक बैठका इथं झाल्या

10/1/2025 16:50:21


कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

10/1/2025 16:48:30


मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट

मुंबईत दोन्ही नेत्यांची झाली भेट

भुजबळांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे धनंजय मुंडेंची माहिती

10/1/2025 16:42:51


उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे स्मारकाची पाहणी

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण

10/1/2025 16:30:47


खंडणी प्रकरणात विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी

हत्या प्रकरणी विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज करणार

एसआयटी आजच प्रक्रिया पूर्ण करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार

10/1/2025 15:34:32


खंडणी प्रकरणी विष्णू चाटेला केज कोर्टात आणले

खंडणी प्रकरणी बीडच्या केज कोर्टामध्ये सुनावणी

10/1/2025 15:14:9


नालासोपाऱ्यातील शंकेश्वरनगरातील घरात स्फोट

एक्सपायर्ड झालेल्या परफ्युम बॉटलवरील तारखा बदलताना स्फोट झाल्याची माहिती

घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी

10/1/2025 13:16:8


संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जालन्यातील जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

मोर्चामध्ये मनोज जरांगे, देशमुख कुटुंबीय सहभागी

मोर्चात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी

10/1/2025 13:8:51


दिल्लीत भाजपाचा पूर्वांचल सन्मान मोर्चा

भाजपा नेते मनोज तिवारींच्या भाजपाचा मोर्चा

मोर्चात भाजपा नेते मनोज तिवारी आक्रमक, आप नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी

10/1/2025 12:39:47


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर

चंद्रपुरातील प्रसिद्ध महाकाला मंदिरात मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आरती

10/1/2025 12:35:56


साताऱ्यातील वाईमध्ये असलेल्या MIDC तील एटीएम अज्ञातांनी फोडले

चोरांनी एटीएममधील 17 लाखांची रोकड केली लंपास

10/1/2025 11:22:33


डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

सकाळी 7 वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती

पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले

10/1/2025 10:17:35


मध्य रेल्वेवर दोन दिवसांचा ब्लॉक

मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेमार्गावर शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर दिनांक 10 जानेवारी आणि 12 जानेवारी (शुक्रवार आणि रविवार) रोजी दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (दुसरा आणि तिसरा) असेल.

हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याची मध्य रेल्वेची माहिती.

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

10/1/2025 8:27:50


धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का

युवासेनेच्या विभागीय सचिवाने स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा

युवासेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवला राजीनामा

10/1/2025 8:27:50


संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा

या मोर्चामध्ये वैभवी देशमुख, धनंजय देशमुख, भाजपा आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे उपस्थित राहणार

मोर्चासाठी 200 कर्मचारी आणि 15 अधिकारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात

संभाजी महाराज चौक ते अंबड चौफुली पर्यंत रस्ता बंद राहणार.

10/1/2025 8:27:50

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -