Homeदेश-विदेशLive Update : कुर्ला येथील एलबीएसमधील रगुन जायका हॉटेलला भीषण आग

Live Update : कुर्ला येथील एलबीएसमधील रगुन जायका हॉटेलला भीषण आग

Subscribe

कुर्ला येथील एलबीएसमधील रगुन जायका हॉटेलला भीषण आग

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहचल्या

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

11/1/2025 20:59:26


रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष

राज्यस्तरीतय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा

11/1/2025 20:45:56


इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

मोहम्मद शमीचे संघान पुनरागमन

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)

11/1/2025 17:27:34


अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची एकाच कार्यक्रमाला हजेरी

अंजनगावमध्ये महावितरणाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र

11/1/2025 17:26:59


आरोपी विष्णू चाटेला दोन दिवसांची सीआयडी कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेला कोठडी

विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे वकिलांचे म्हणणे

11/1/2025 12:58:51


बीड प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात येणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार

हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पथकाने हत्येतील सर्व आरोपींवर मकोका लावल्याची माहिती आहे

वाल्मिक कराडला अजून हत्येच्या गुन्ह्यात आरोपी केलेले नाही

खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड सोडून सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांना हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असल्याची माहिती

11/1/2025 12:56:20


मुंबईत बेस्ट बसने दोघांना उडवले

अपघातात दोघेजण जखमी

विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये घडला बसचा विचित्र अपघात

बस स्थानकात बस सुरूच ठेऊन चालक नियंत्रण कक्षात गेल्याने घडला अपघात

कन्नमवार नगर बस स्थानकात उभी असलेली बस अचानक सुरू झाल्याने अपघात घडल्याची माहिती

11/1/2025 12:51:46


संतोष देशमुख हत्याप्रकरणात धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

मोर्चामध्ये आमदार सुरेश धस सहभागी

11/1/2025 12:20:0


अफगाणिस्तानला भूकंपाचा धक्का

4.2 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची राष्ट्रीय भूकंप केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे

भारतीय वेळेनुसार सकाळी 05 वाजून 05 मिनिटांनी उत्तर अफगाणिस्तानमध्ये झाला भूकंप

11/1/2025 12:9:56


संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार

जिजाऊ चौक ते आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार

छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे उपस्थित राहणार

11/1/2025 8:15:11


कल्याणमध्ये भरधाव कारचालकाची 8 ते 10 दुचाकींना धडक

कल्याणमध्ये मद्यधुंद कारचालकाचा प्रताप

11/1/2025 8:15:11


राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणात जयदीप आपटेला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी पार पडलेली सुनावणी

25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायाधीश एनआर बोरकर यांनी जयदीप आपटेला जामीन मंजूर केला.

1 ऑक्टोबरला ओरसच्या सत्र न्यायालयाने जयदीप आपटेचा जामीन नाकारला होता.

ओरस सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वकील गणेश सोवानी यांच्या माध्यमातून त्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते

11/1/2025 8:15:11