राज्य मंत्रिपरिषदेची गुरुवारी बैठक
मंत्रालयात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या बैठकीला राज्यमंत्री राहणार उपस्थित
15/1/2025 21:46:5
बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर
15/1/2025 17:51:16
पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला
मिरा रोड रेल्वे स्टेशनवर दोन लोकल एकाच ट्रॅकवर समोरासमोर
15/1/2025 16:54:28
वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पांगरीत महिलांकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात
15/1/2025 16:50:27
वाल्मीक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
न्यायालयात परिसरात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
वाल्मीक कराडच्या समर्थकांची न्यायालयाबाहेर घोषणाबाजी
15/1/2025 16:19:47
पंतप्रधान मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण
15/1/2025 16:17:8
वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न
अंगावर रॉकेल ओतून कराड समर्थकाने स्वत:ला पेटवून घेण्याचा केला प्रयत्न
पांगरी गावात कराड समर्थक आक्रमक
15/1/2025 15:34:30
सुप्रिया सुळेंची अमित शहा आणि भाजपा नेत्यांवर टीका
शरद पवारांवर बोलण्यापेक्षा अमित शहा बीड आणि परभणीबद्दल बोलतील अशी केंद्रीय गृहमंत्र्यांकडून एक नागरिक आणि खासदार म्हणून आपेक्षा होती.
15/1/2025 15:20:59
परळीत कराड समर्थक, सुरेश धस समर्थकांचे आंदोलन
वाल्मिक कराडवरील गुन्हा मागे घ्या, कराड समर्थकांच्या मागणी
मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा
दोन तासांपासून परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
दुसरीकडे सुरेश धस यांच्या समर्थकांकडूनही आंदोलन
15/1/2025 13:9:2
सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा
पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याच्या सूचना
खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत
15/1/2025 13:5:29
पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांसोबत संवाद सुरू
नेव्हीच्या आंग्रे सभागृहात आमदारांसोबत संवाद सुरू
15/1/2025 12:49:41
वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
केज कोर्टात वाल्मिक कराडला हजर करणार नाही
सुरक्षेच्या कारणामुळे केजऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार
15/1/2025 12:15:53
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण
भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार
पंतप्रधान मोदींच्या हस्ते INS सुरत, INS वाघशीर, INS निलगिरीचे लोकार्पण
15/1/2025 11:25:46
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पानबुड्यांचे राष्ट्रार्पण
15/1/2025 10:59:47
काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन
इंदिरा गांधी भवन हे काँग्रेसचे नवे मुख्यालय
9 ए कोटला मार्गावर इंदिरा गांधी भवन
15/1/2025 10:53:36
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नवी मुंबईच्या दौऱ्यावर
महायुतीच्या नेत्यांसोबत साधणार संवाद
15/1/2025 9:54:12
आरोपी विष्णू चाटेच्या निलंबनानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली कारवाई, धनंजय मुंडेंना धक्का
चारित्र्याची पडताळणी करून नेमणुका करण्याच्या तटकरे यांच्या सूचना
15/1/2025 9:34:9
शिवसेना उबाठा आमदार प्रवीण स्वामींविरोधात याचिका दाखल
आमदार प्रवीण स्वामींचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा उल्लेख
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून याचिका दाखल
शिवसेना उबाठाचे नेते प्रवीण स्वामी हे उमरग्याचे आमदार
15/1/2025 8:55:30
समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू
पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसची ट्रकला धडक
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती
जखमींवर धामणगाव रुग्णालयात उपचार सुरू
15/1/2025 8:48:48
वरळी हिट ऍंड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी पक्षपाती तपास केल्याचा आरोप
मृत कावेरी नाखवांचे पती प्रदीप नाखवा यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्याची याचिकेतून मागणी
7 जुलै 2024 रोजी झालेल्या या अपघातात शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहांचा मुलगा मुख्य आरोपी
दारूच्या नशेत मिहीर शहाणे कावेरी नाखवा यांना गाडीखाली चिरडले
15/1/2025 8:25:31
वाल्मिक समर्थकांची आज परळी बंदची हाक
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक
सकाळी 10 वाजता वाल्मिक समर्थकांची बैठक
15/1/2025 7:32:29
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात
गोठेघरजवळ मालवाहतूक ट्रकला बसची धडक
15/1/2025 7:19:31
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान घेणार महायुतीच्या आमदारांची भेट
पंतप्रधान मोदींच्या हस्ते युद्धनौका पाणबुडीचे राष्ट्रार्पण
15/1/2025 7:3:59