पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने
प्रभादेवी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने
तांत्रिक बिघाड दुरुस्त पण लोकल मात्र उशिराने
31/12/2024 22:46:2
वाल्मीक कराडला केज न्यायालयात केले हजर
केज न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
31/12/2024 22:43:51
वाल्मीकच्या प्रकरणातील सरकारी वकील बदलला
नवे सरकारी वकील म्हणून जे बी शिंदेंची निवड
31/12/2024 22:36:30
केज न्यायालयाबाहेर पोलीसानाचा कडेकोट बंदोबस्त
सुनावणीआधी केज रुग्णालयात वाल्मीक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू
वाल्मीक कराडचे वकील न्यायालयात दाखल
31/12/2024 22:1:45
मुंबईत शिवसेना विभागप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
अज्ञाताविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकरांना धमकी
वांद्रे येथील कार्यालयात धमकीचे पत्र
31/12/2024 21:54:58
वाल्मीक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे
केज कोर्टबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची गर्दी
परिसरात जमलेल्या सर्वांना पोलिसांनी हटवले
केज कोर्टात आजच सुनावणी होणार
31/12/2024 20:50:14
मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या जलसमाधी आंदोलन करणार
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तीन आरोपी फरार
या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, मस्साजोगच्या गावकऱ्यांची मागणी
आरोपींना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अटक झाली नाही, तर गावकरी जलसमाधी आंदोलन करणार
दवंडी देत ग्रामस्थांनी उद्याच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन
31/12/2024 20:45:25
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जाहीर
26 मार्चपासून बीएससी, बीएच्या परीक्षा जाहीर
18 मार्चपासून बीकॉमच्या परीक्षा
परीक्षा केंद्रांची माहिती ऑनलाईन उपलब्ध
31/12/2024 19:28:20
मुंबई – नववर्षाच्या स्वागतासाठी फटक्यावर बंदी
समुद्रकिनारी, गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांवर बंदी
गेट वे, मरीन ड्राईव्ह, चौपाटी भागात आदेश जारी
31/12/2024 19:23:57
कराडच्या समर्थकांकडून कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न
कोर्टाच्या आवारातील गाड्या बाहेर काढण्यासाठी दमदाटी
कोर्टच्या कर्मचाऱ्यांना वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून दमदाटी
31/12/2024 19:19:37
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
विधानसभेतील विजयाबद्दल मोदींकडून अभिनंदन
31/12/2024 18:14:20
कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी होणार
सीआयडीने केलेली विनंती केज कोर्टाकडून मान्य
सीआयडीचे पथक वाल्मीक कराडला घेऊन केजकडे रवाना
वाल्मीक कराडवरील गुन्ह्याची सुनावणी आजच होणार
31/12/2024 16:59:24
आत्मसमर्पण केलेल्या वाल्मी कराडची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू
सीआयडीच्या पोलीस अप्पर महासंचालकांकडून कराडची चौकशी
31/12/2024 12:56:1
वाल्मीक कराडचे पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण
वाल्मीक कराडचे पुणे पोलिसांना आत्मसमर्पण
वाल्मीक कराडने व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत, त्यांना अटक करावी – वाल्मीक कराड
31/12/2024 12:7:16
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटेची आज वैद्यकीय चाचणी
आरोपी विष्णु चाटेसह अन्य चार आरोपींचीही होणार वैद्यकीय चाचणी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार
31/12/2024 11:57:47
सरपंच संघटनांनी पुकारले काम बंद आंदोलन
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरातील सरपंच संघटनांनी ग्रामपंचायतचे काम बंद आंदोलन पुकारले
सरपंच संघटनेच्यावतीने ग्रामपंचायतीसमोर काळ्याफिती लावून आंदोलन करण्यात येणार
31/12/2024 10:22:27
खासदार बजरंग सोनवणेंचा आमरण उपोषणाचा इशारा
खासदार सोनावणेंचे पोलीस आणि सीआयडीला 02 जानेवारीपर्यंतचे अल्टिमेटम
02 जानेवारीपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर खासदार बजरंग सोनवणेंकडून अमरण उपोषणचा इशारा
31/12/2024 9:17:3
मुंबईतील तपमानाचा पारा 34 अंशावर
दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल तपमानात वाढ
मुंबईत तपमानाचा पारा चढताच राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती
मुंबईकरांनी नववर्षाचे स्वागत वाढत्या तपमानात करावी लागणार
31/12/2024 8:26:4
केंद्रीय मंत्री शहांकडून वायनाडमधील भूस्खलन नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
वायनाडच्या खासदार प्रियंका गांधींनी या निर्णयामुळे शहांचे केले कौतुक
नैसर्गिक आपत्ती घोषित केल्यामुळे गरजूंना बरीच मदत मिळेल – प्रियंका गांधी
31/12/2024 8:26:4
न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये सहा जणांवर गोळीबार
ज्या सहा जणांवर गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये 12 वर्षांच्या मुलीचा समावेश
न्यूयॉर्क पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू
31/12/2024 8:26:4