नागपुरात प्रियंका गांधींच्या रॅलीत भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने
17/11/2024 16:12:6
बार्शीमध्ये रॅलीदरम्यान झालेल्या दगडफेकीप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
दगडपेकीत प्रचार रॅलीतील दोन महिला जखमी
दिलीप सोपल यांच्या समर्थकांकडून दगडफेक झाल्याचा राजेंद्र राऊत यांचा आरोप
17/11/2024 15:49:44
बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं
प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश नाकारण्यात आला
सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाण्यापासून मज्जाव केला
बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये शॉपिंगसाठी गेल्या असताना गेट बंद करण्यात आले
17/11/2024 15:47:59
ही माझी शेवटची निवडणूक – दीपक केसरकर
लवकरच माझा वारसदार ठरेल
माझा राजकीय वारसदार मुलगी सोनाली नाही
17/11/2024 14:48:27
गुहागरमध्ये वंचितच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला
विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला
हल्ल्यात विकास जाधव गंभीर जखमी
हॅाटेलमध्ये जेवताना जाधवांवर तिघांनी केला हल्ला
जाधवांवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
17/11/2024 14:24:52
जळगावात 5 कोटी 59 लाख 61 हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त
जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांची कारवाई
दोन दिवसांत 100 कोटींचे सोने आणि चांदी मुंबई, नागपूर आणि जळगावात जप्त करण्यात आल्याची माहिती
17/11/2024 13:3:0
मुंबईत पीएचडीसाठीच्या पूर्व परीक्षेच्या केंद्रावर गोंधळ
मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडीसाठी पूर्व परिक्षेचे आयोजन
17/11/2024 12:53:0
आदित्य ठाकरेंकडून शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन
17/11/2024 12:23:8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन
कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिंदेंकडून अभिवादन
एकनाथ शिंदेंसह नीलम गोऱ्हेकडून देखील स्मारकाला अभिवादने
17/11/2024 12:14:31
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांचा रोड शो
जयताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो
17/11/2024 11:53:45
गडचिरोलीमध्ये मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये 76 मतदान पथके रवाना
19 तारखेला कर्मचाऱ्यांचा दुर्गम भागात पायी प्रवास
17/11/2024 11:47:35
जोर का झटका धीरे से लगा – उपमुख्यमंत्री अजित पवार
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका
अजित पवारांचे बारामतरीकरांना आवाहन
मी शरद पवारांना सोडलं नाही
बारामतीत अजित पवारांचे मोठं वक्तव्य
17/11/2024 11:23:49
अहिल्यानगरमध्ये जम्मू-काश्मीरमधील 9 जणांना अटक
बनावट बंदूक परवान्याद्वारे नोकरी मिळवणारे 9 जण अटकेत
मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाई
17/11/2024 10:52:12
बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली
17/11/2024 10:44:51
मुंबईहून नांदेडला जाणाऱ्या बसमधून रोकड जप्त
जप्त केलेली रोकड एक कोटींपर्यंत असण्याची शक्यता
निवडणूक विभाग आणि पोलिसांकडून रोकड मोजण्याचे काम सुरू
17/11/2024 10:33:33
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा आज 12 वा स्मृतिदिन
राज्यभरातील शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार
17/11/2024 10:27:4
आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॅाक
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॅाक असेल
तर हार्बर मार्गावर अप आणि डाउन 12 तासांचा ब्लॉक असणार आहे
17/11/2024 10:20:0
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातील सभा रद्द
अमित शहा तातडीने दिल्लीला रवाना
नागपूर, वर्धा आणि गडचिरोलीत शहांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते
17/11/2024 9:58:43
बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
या आरोपीला पंजाबमधून अटक करण्यात आली
पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हेशाखेची संयुक्त कारवाई
17/11/2024 8:51:50
आज शिवसेना ठाकरे गटाची बीकेसीवर सांगता सभा
17/11/2024 8:38:33
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12 वा स्मृतिदिन
राज्यभरातील शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सकाळी 10 वाजता स्मृतीस्थळावर पोहोचणार
17/11/2024 8:33:44
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची आज गडचिरोलीत सभा
गडचिरोलीतील सभेनंतर नागपुरात रोड शो देखील होणार
17/11/2024 8:32:9
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गडचिरोलीत सभा
नागपूरमध्ये देखील अमित शहांच्या सभेचे आयोजन
महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचे आयोजन
17/11/2024 8:26:18