नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप- पवार गटात राडा
राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंकडून पैसे वापट केल्याचा आरोप
भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांचे गंभीर आरोप
18/11/2024 22:5:12
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर झाली दगडफेक
काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ झाली दगडफेक
18/11/2024 21:21:21
राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाने हजर राहण्याचे दिले आदेश
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना 2 डिसेंबरला हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश
पुणे प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिले आदेश
18/11/2024 21:5:56
महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
शेवटच्या एका तासात राज्यात प्रचार सभांचा धुमधडाका
18/11/2024 18:6:25
बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभा
लेंडीपट्टा मैदानात पुतण्याची सभा तर मिशन बंगल्यावर काकांची सभा
बारामतीत शरद पवारांची सांगता सभा, युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची सभा
बारामतीत अजित पवारांचीही सांगता सभा
बारामतीत पवार विरुद्ध पवार प्रचाराचा जोर
18/11/2024 16:17:57
महाराष्ट्र आणि झारखंडच्या करदात्यांना मिळणार सुट
जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना सुट
18/11/2024 14:33:52
नाशकात नामांकित हॅाटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई
5 कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती
18/11/2024 12:15:13
सिंधुदुर्गामध्ये आंबोली घाटात दुचाकीची संरक्षक कठड्याला धडकून दुर्घटना
दुचाकीवर मागच्या दिशेला बसणारा युवक थेट 1 हजार फूट दरीत कोसळला
अपघातात तरूण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
18/11/2024 11:13:50
वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांचा प्रचार
मराठी कलाकारांचा प्रचारसभेत सहभाग
अमृता खानविलकर आणि वैभव तत्ववादी तसेच अनेक मराठी कलाकारांचा सहभाग
18/11/2024 11:11:50
नवाब मलिकांची मतदारसंघात प्रचाररॅली
शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात मलिकांची प्रचाररॅली
सना मलिक यांच्यासह नवाब मलिकांची रॅली
18/11/2024 11:2:32
उद्धव ठाकरे उद्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार
दोन आठवड्यात ठाकरेंनी महाराष्ट्रात 40 सभा घेतल्या
18/11/2024 10:50:1
थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद
सकाळी 11 वाजता मुंबईत राहुल गांधींची पत्रकार परिषद
मविआच्या पंचसुत्री कार्यक्रमासंदर्भात ठाम भूमिका मांडणार
18/11/2024 10:42:11
वीज क्षेत्राचे अभ्यासक प्रताप होगाडेंचे निधन
ह्रदयविकाराच्या झटक्याने प्रताप होगाडेंचे निधन
18/11/2024 10:4:17
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची हत्या
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हत्येप्रकरणी तिघांना अटक
डोणजे परिसरात खंडणीसाठी बिल्डरचे अपहरण करून हत्या केल्याची घटना
पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक तर मुख्य आरोपी फरार
18/11/2024 9:50:40
मुंबईतील कोस्टल रोडचे काम 93 टक्के पूर्ण
जानेवारीच्या मध्यापर्यंत कोस्टल रोड प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
जानेवारी महिन्यात वरळी ते वांद्रे वाहतूक होणार सुरू
पाऊण तासांचा प्रवास 12 मिनिटांत करता येणार
18/11/2024 9:44:40
मुंबई पोलीस दलातील आणखी एका शिपाईवर गुन्हा दाखल
टपाली मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॅाट्सअॅप केल्याचा धक्कादायक प्रकार
शिवडी पोलीस ठाण्यात शिपाईविरोधात गुन्हा दाखल
18/11/2024 9:42:22
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार
जळगावातील मेहरूण परिसरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
पहाटे चारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला
18/11/2024 9:35:49
शरद पवारांची बारामतीमध्ये आज सांगता सभा
18/11/2024 9:34:53
वर्धामध्ये शिरपूर येथे खडकीतून मद्यसाठा जप्त
शेतातून तब्बल दीडशे पेट्या विदेशी दारू जप्त
मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई
18/11/2024 8:54:44
संभाजीनगरमध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका
निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्याने कारवाई
33 खासगी अनुदानीत शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई
एकूण 92 शाळांनी शाळेतील शिक्षक दिले नसल्याची माहिती
18/11/2024 8:23:28
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 25 वी अटक
आकोल्यातून सलमान वोहरा याला अटक
मुंबई गुन्हे शाखेची अकोल्यात मोठी कारवाई
गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू
सलमान इकबालभाई वोहरा गुजरातच्या पेतलाड येथील रहिवाशी
18/11/2024 7:42:56
विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार
अधिसूचना जारी झाल्यापासून 28 दिवस निवडणूक प्रचार
सर्व नेते आज आपआपल्या होमग्राऊंडवर सभा आणि पदयात्रा करणार
18/11/2024 7:25:8
जनसुराज्य शक्ती पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर हल्ला
संताजी घोरपडेंवर पाच ते सहा अज्ञातांकडून धारदार शस्त्राने हल्ला
संताजी घोरपडेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
प्रचारसभा करून येताना मानवाडजवळ सहा ते सात जणांकडून हल्ला
18/11/2024 7:19:32