भाजपाच्या पेण आणि उरणमधील उमेदवारांना शेकापाने पाठिंबा जाहीर केल्याची अफवा
शेतकरी कामगार पक्षाने स्वत: केला खुलासा
भाजपाने बनावट लेटरहेड वापरून सोशल मीडियावर शेअर केल्याचाही शेकापचा आरोप
19/11/2024 20:26:24
शिवसेना वसई तालुकाप्रमुख सुदेश चौधरींना क्षितीज ठाकूर यांच्याकडून मारहाण
भाजपा मंडळ अध्यक्ष नारायण मांजरेकरांनाही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
19/11/2024 19:20:17
विरार पैसे वाटल्याप्रकरणी विनोद तावडेंची पत्रकार परिषद रद्द
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पत्रकार परिषद रद्द
पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे हे विनोद तावडेंच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहचले
19/11/2024 17:40:26
विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा – रमेश चेन्निथला
विनोद तावडे यांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटले जात आहेत
19/11/2024 17:39:51
भाजपा नेते विनोद तावडेंवर गुन्हा दाखल
विनोद तावडे यांच्यासोबत राजन नाईक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल
विरारच्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
19/11/2024 15:41:2
बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजपामध्ये प्रवेश
सुरेश पाडवी हे बविआचे पालघर विधानसभेचे उमेदवार
उद्या मतदान आणि आज बविआच्या उमेदवाराचा भाजपामध्ये प्रवेश
19/11/2024 15:39:36
विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून गेले
19/11/2024 15:8:22
विनोद तावडे, हितेंद्र ठाकूरांची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली
19/11/2024 15:6:56
विवांत हॉटेलमधील रुममध्ये 09 लाख रुपयांची रोकड सापडली
रुम क्रमांक 406 मध्ये रोकड सापडल्याची माहिती
19/11/2024 14:29:1
बविआच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून विनोद तावडेंची गाडी तपासली
भाजपा आणि बहुजन विकास आघाडीत नालासोपाऱ्यात मोठा राडा
पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद
राडा झालेल्या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडेही उपस्थित
19/11/2024 12:49:38
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसवर प्रवाशाकडून 42 लाख रुपये जप्त
ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून 42 लाखांची रोकड जप्त
समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रवाशाकडील रोकड ताब्यात
19/11/2024 12:20:45
श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन
श्रीनिवास पवार बारामतीचे पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवारांचे वडील
शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून रात्रीच्यावेळी सर्च ऑपरेशन
19/11/2024 10:54:51
संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांविरोधात अंबादास दानवेंची तक्रार
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार
पोलीस आयुक्त सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मजत करत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप
19/11/2024 9:29:43
जुन्नरमध्ये महामार्गावर कुकर नेणारा ट्रॅक पकडला
एसएसटी पथकाकडून 01 हजार 361 कुकरची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
लातूरहून राहुरी तालुक्यात जाण्यासाठी निघाला होता ट्रक
ट्रक राहुरीकडे न जाता आळेफाटा परिसरात आला
19/11/2024 9:10:57
हिंगोलीत वंचितच्या उमेदवारावर हल्ला
वंचितचे उमेदवार दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला
हल्ल्यात गाडीच्या काचा फोडल्याने दिलीप मस्के गंभीर जखमी
दिलीप मस्केंवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर मतदारसंघातील गंगापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर हल्ला
अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक
गाळमीण रोडवर सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक
19/11/2024 7:50:21
दिल्लीहून 30 मिनिटांत अमेरिकेत पोहोचता येणार असा एलन मस्क यांचा दावा
SpaceX चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या दाव्याची सर्वत्र चर्चा
मस्क यांनी आपली कंपनी SpaceX चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘अर्थ-टू-अर्थ’ अंतराळ प्रवास आता लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याची घोषणा
पृथ्वीवरील एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासाचे भविष्य पूर्णपणे बदलू शकते, असे मस्क यांचे म्हणणे
19/11/2024 7:50:21