Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLive Update : अमरावती शहरातील गोपाळनगर परिसरात राडा

Live Update : अमरावती शहरातील गोपाळनगर परिसरात राडा

Subscribe

अमरावती शहरातील गोपाळनगर परिसरात राडा

4 ईव्हीएम मशीन दुचाकीवरून घेऊन गेल्याचा नागरिकांचा आरोप

- Advertisement -

राजीव गांधी विद्यालयातून ईव्हीएम मशीन घेऊन जाताना घडला प्रकार

20/11/2024 22:10:35

- Advertisement -

नागपूरमध्ये अज्ञातांकडून ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर दगडफेक

किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 मधून ईव्हीएम घेऊन जाताना दगडफेक

ईव्हीएम नेणाऱ्या गाडीच्या काचा फुटल्या

20/11/2024 20:44:16


टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार, मविआला 136-145 जागा

महायुती 129-139 जागा जिंकणार त्यात भाजपला 81हून जागा

शिवसेना शिंदे गटाला 25 हून अधिक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 हून अधिक जागा मिळणार

महाविकास आघाडीला 136-145 जागा ज्यामध्ये काँग्रेसला 50 हून अधिक

शिवसेना उबाठा 44 हून अधिक राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 हून अधिक जागा मिळू शकतात

20/11/2024 20:20:10


चाणक्य स्ट्रॅटेजीक पोलनुसार भाजपला 90 हून अधिक जागा

महायुतीला 152-160 जागा मिळतील ज्यामध्ये भाजपला 90 हून अध्क जागा मिळतील

शिवसेना शिंदे गटाला 48 हून अधिक तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 22 हून अधिक

महाविकास आघाडीला 130 – 138 जागा मिळतील ज्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 63 जागा मिळतील

यामध्ये शिवसेना उबाठाला 35 हून अधिक तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 40 हून अधिक जागा मिळतील

तर, इतर पक्षांना 6 – 8 जागा मिळतील

20/11/2024 19:5:54


महायुतीला 122-186 जागा मिळणार – पोल डायरी

भापला 77 – 108 जागा, शिवसेना शिंदे गटाला 27 – 50 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळू शकतात

महाविकास आघाडीला 69 – 121 जागांवर विजय मिळू शकतो

यामध्ये काँग्रेसला 28-47, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 16-35 तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा 25-39 जागा

इतर पक्षांना 12-29 जागांवर जिंकतील

20/11/2024 18:55:41


मॅट्रिझ पोलनुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळणार

भाजपला सर्वाधिक 89 ते 101 जागा तर, शिवसेना शिंदे गटाला 35 ते 45 जागा मिळू शकतात

तेच महायुतीचा तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 17 ते 26 जागा मिळतील

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 ते 43 तर काँग्रेसला 39 ते 47 जागा मिळू शकतात

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 ते 39 जागा मिळू शकतात

20/11/2024 18:49:15


78 जागांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार – इलेक्ट्रोल एज पोल

शिवसेना शिंदे गट 26, अजित पवार गट 14, काँग्रेस 60, शरद पवार 46 आणि ठाकरे गटाला 44 जागा मिळण्याचा अंदाज

इतर पक्षांना 20 जागा मिळणार

महायुतीला 121 तर महाविकास आघाडीला 150 जागा मिळणार

20/11/2024 18:33:2


भंडाराच्या तुमसरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी

भंडाराच्या तुमसर मतदारसंघातील मतदान केंद्रावर राडा

राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी

मतदारांना मतदार केंद्रावर पोहोचावल्याने शरद पवार गटाचा आक्षेप

20/11/2024 17:38:24


साताऱ्याच्या खंडाळा येथे मतदान करताना मतदाराचा मृत्यू

हृदविकाराचा झटका आल्याने 67 वर्षांच्या शाम धायगुडे यांचा मृत्यू

20/11/2024 17:26:52


कर्जत – जामखेडमध्ये राम शिंदेंच्या नातेवाईकांकडून पैसे वाटपाचा आरोप

रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी संबधित व्यक्तीला पकडले

खांडेकर नावाच्या व्यक्तीकडे लाखोंची रोकड आणि याद्या, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

20/11/2024 17:17:10


धुळे शहरात भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा वंचितचा आरोप

20/11/2024 17:14:8


नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांचे समर्थक भिडले

भाईंदर परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण

पोलिसांकडून तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात

गीता जैन समर्थकांनी धमकावल्याचा नरेंद्र मेहतांच्या कार्यकर्त्यांचा आरोप

20/11/2024 17:10:31


वर्धा – नितेश करळे यांना मारहाण झाल्याची घटना

भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप

मांडवा गावात मारहाण झाल्याचा गंभीर आरोप

20/11/2024 16:19:37


भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शा‍ब्दिक चकमक

प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची पोलिसांसोबत शा‍ब्दिक चकमक

सायन कोळीवाडा येथे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक

20/11/2024 16:1:4


संभाजीनगर शहरात नारेगावमध्ये पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

20/11/2024 15:8:46


बारामतीच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळ

शर्मिला पवार बारामतीच्या मतदान केंद्रात पोहोचल्या

बारामतीत दमदाटी करून मतदान केलं असल्याचा आरोप

दमदाटी करणारे घडाळ्याचे कार्यकर्ते – शर्मिला पवार

20/11/2024 12:54:30


धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त

धुळे पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा जप्त

जप्त करण्यात आलेली चांदी बँकेची असल्याची माहिती

20/11/2024 10:14:1


नांदगाव-मनमाड रस्त्यावर दोन गटात राडा

सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले

20/11/2024 9:7:23


शरद पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार

बारामतीच्या मतदान केंद्रावर शरद पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार

प्रतिभा पवारांनी देखील बजावला मतदानाचा अधिकार

20/11/2024 8:59:10


अभिनेता फरहान अख्तर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन

20/11/2024 8:45:11


धुळ्यात तब्बल 500 महिला एकाच वेळी मतदान केंद्रावर

धुळ्यात 500 महिला एकत्र मतदानासाठी पोहचल्या

20/11/2024 8:33:21


संभाजीनगरमधील रामनगर गावात नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

गावात पायाभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांची भूमिका

20/11/2024 8:31:12


सचिन तेंडुलकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

नागरिकांना मतदान करण्यासाठी केले आवाहन

20/11/2024 8:27:36


ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही – खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत बजावला मतदानाचा अधिकार

बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत

20/11/2024 8:24:41


कोल्हापूरच्या विक्रम हायस्कूल मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद

20/11/2024 8:23:53


आकोल्यातील पश्चिम मतदारसंघातील बूथ क्रमांक 169 मध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

20/11/2024 8:23:0


पैठण तालुक्यातील जायकवाडी मतदान केंद्रावर 15 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद

20/11/2024 8:20:7


मनसे उमेदवार अमित ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार

अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

अमित ठाकरे माहिममधून मनसेचे अधिकृत उमेदवार

लोकांचा कौल 23 तारखेला कळेल – अमित ठाकरे

मी लोकांपर्यंत पोहोचलो-  अमित ठाकरे

20/11/2024 8:15:5


मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क

20/11/2024 8:13:27


युगेंद्र पवारांनी बारामतीत बजावला मतदानाचा अधिकार

युगेंद्र पवारांनी सहकुटुंब केले मतदान

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे

पवारांनी केलेला विकास लक्षात ठेवावा – युगेंद्र पवार

20/11/2024 8:11:15


खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा अधिकार

नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

20/11/2024 8:7:46


अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा अधिकार

लोकांना मतदान करण्याचे केले आवाहन

20/11/2024 8:4:39


भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा अधिकार

20/11/2024 8:2:48


सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार

नागपुरात बजावला मतदानाचा हक्क

20/11/2024 8:1:43


अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

सुनेत्रा पवारांनी देखील बजावला मतदानाचा हक्क

20/11/2024 7:52:47


प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटाने सुरू

20/11/2024 7:30:40


राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

राज्यभरात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात

राज्यातील सर्व 288 मतदारसंघात आज मतदान

महायुती आणि मविआतील सहा पक्षांमध्ये मुख्य लढत

अनेक लहान पक्षही निवडणुकीच्या रिंगणात

चार हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात

20/11/2024 7:21:12


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -