Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज

Live Update : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज

Subscribe

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी 26 वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर

- Advertisement -

सकाळी 08 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणी

मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

- Advertisement -

ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 14 टेबल

टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण 3/5 टेबल

मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

मतमोजणी केंद्राच्या 300 मीटर परिसरात मनाई आदेश लागू

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष

प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर

भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश

प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल

प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल

22/11/2024 20:58:1


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

सुमित दिनकर बाग असेल अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

आतापर्यंत 26 जणांना अटक

22/11/2024 16:50:38


भिवंडीमधील नागाव परिसरात भंगाराच्या गोदामाला आग

गोदामात प्लास्टिकचं साहित्य असल्याने आग पसरली

अचानक आग लागल्याने गोदामातील कामगारांची पळापळ

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

22/11/2024 16:47:46


जागतिक बाजारपेठेत मोठी तेजी

सेन्सेक्स 1 हजार 961 अंकांनी वधारला

सेन्सेक्स 1961 अंकांनी वाढून 79 हजार 117 वर थांबला

निफ्टी 557 अंकांनी वाढून 23 हजार 907 वर थांबला

22/11/2024 15:30:17


IND vs AUS Test : पहिला दिवस गोलंदाजांचा, पडल्या 17 विकेट्स

ऑस्ट्रेलियाची दिवसाखेर 67 वर 7 अशी अवस्था होती

तर भारतीय संघ हा 150 वर सर्वबाद झाला

22/11/2024 15:4:19


नाशिकमध्ये विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी

नाशिकमध्ये पोलीस आणि एसआरपीच्या तुकड्या तैनात

उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर बंदोबस्त

22/11/2024 14:15:58


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपाची बैठक

भूपेंद्र यादव, चंद्रशेखर बावनकुळे तसेच रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित

22/11/2024 13:47:43


मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सचिन शिंदे दादरमधील भाजपाचे नेते

22/11/2024 13:36:54


मनसे नेते बाळा नांदगावकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले

22/11/2024 12:52:5


मुंबईत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

काँग्रेस नेत्यांचा सर्व उमेदवारांसोबत संवाद

रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसेच नाना पटोले यांची बैठकीला उपस्थित

22/11/2024 12:32:46


मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदे मशाल हाती घेणार

आज दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार

22/11/2024 11:42:30


छत्तीसगडमधील सुकमा येथे चकमक झाल्याची माहिती

सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

चकमकीत 10 नक्षलवादी मारल्याची माहिती

22/11/2024 11:37:48


CNG च्या दरात किलोमागे 02 रुपयांनी वाढ

दरवाढीमुळे सीएनजी आता 77 रुपये किलो

22/11/2024 11:31:39


समीर वानखेडेंकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

नवाब मलिकांवरील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्या – समीर वानखेडे

राज्य सरकारविरोधात वानखेडेंची याचिका

मलिकांना अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात अटक होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे

22/11/2024 10:51:41


सांगलीत म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू

सांगलीतील शाळगाव एमआयडीसीतील घटना

उपचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू

कराडमधील सह्याद्री रुग्णालयात पाच जणांवर उपचार सुरू

22/11/2024 10:16:22


प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींविरोधात गुन्हा दाखल

आंदोलन करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शरद कोळींविरोधात काँग्रेसच्या महिला आक्रमक

शरद कोळींच्या कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

22/11/2024 9:49:2


नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि नारायण राणेंची चर्चा

22/11/2024 9:45:50


डिसेंबरमध्ये नागपुरात नव्या सरकारचं पहिले अधिवेशन होणार

नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तयारी सुरू

22/11/2024 9:43:35


राज्यात एकूण 66.05 टक्के मतदान झाल्याची माहिती

राज्यातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत 1 टक्का वाढ

निवडणूक आयोगाकडून तिसऱ्यांदा टक्केवारीत बदल

22/11/2024 9:27:5


सेन्सेक्स 185 तर निफ्टी 60 अंकांनी वधारला

कालच्या पडझडीनंतर शेअर बाजार सावरला

अदानी समुहाच्या समभागात विक्रीचा सपाटा कायम

22/11/2024 9:24:36


दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञानात पास होण्यासाठी 35 गुण आवश्यक

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 20 मार्कांचा निकष या परीक्षेला लागू होणार

22/11/2024 9:17:18


पुण्यात नववीतील विद्यार्थ्याचा काचेच्या तुकड्याने गळा चिरला

पुण्यातील एका शाळेत धक्कादायक प्रकार

हडपसरच्या मांजरी परिसरातल्या शाळेतील घटना

या घटनेत 15 वर्षीय विद्यार्थी जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

पुण्यातील शाळेत वार्षिक समारंभावरून वादावादी

22/11/2024 9:14:57


मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनाचा रात्री अपघात

चेंबुरच्या छेडा नगर येथे निर्भया पथकाच्या वाहनाचा अपघात

अपघातात 2 पोलीस कर्मचारी जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

22/11/2024 9:3:31


राज्यात निवडणुकीशी संबंधित 159 गुन्हे दाखल

ईव्हीएम तोडफोड तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

ईव्हीएम मशीन मोडतोडप्रकरणी 11 जणांना अटक

22/11/2024 8:40:3


महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक

विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग

विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

22/11/2024 7:57:16


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल

4136 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीतून उलघडणार

राज्याच्या महानिकालाकडे सर्वांचेच लक्ष

22/11/2024 7:39:37


यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर

यूजीसी नेट परीक्षा 1 ते 19 जानेवारीदरम्यान पार पडणार

10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

22/11/2024 7:33:23


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -