राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला उद्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार
25/11/2024 23:31:25
उद्या सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे देणार राजीनामा
25/11/2024 23:4:34
नंदुरबार – तळोद्याहून धनपूरकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात
तळोद्याच्या रांजणी फाट्याजवळ बस पलटली
खड्डे वाचवण्याच्या नादात अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
25/11/2024 21:25:59
चारचाकी वाहनाची रस्त्यावरील नागरिकांसह दुचाकी, चारचाकीला धडक
अपघातात दोघे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू
अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील घटना
25/11/2024 21:15:44
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटातील पराभूत उमेदवारांची बैठक
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार या उमेदवारांची बैठक
शरद पवार आणि जयंत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार ही बैठक
25/11/2024 19:50:1
शिवसेना ठाकरे गटाने लिहिलेच्या पत्रात सचिवालयाकडे मागणी
विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत
शिवसेना ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र
25/11/2024 18:26:24
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, ठाण्यात महिलांकडून आरती
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ठाण्यात केली आरती
25/11/2024 17:32:38
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना
रात्री 10.30 अमित शहांसोबत बैठक होण्याची शक्यता
25/11/2024 17:15:58
सुनील तटकरे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहोचले
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सुनील तटकरे देवगिरीवर पोहोचले
एकनाथ शिंदेंची चर्चा करण्याआधी अजित पवार – सुनील तटकरे यांची गुप्त बैठक
शिंदेची भेट घेऊन पुन्हा एकदा सुनील तटकरे हे अजित पवारांच्या भेटीला गेले
25/11/2024 17:13:35
मुंबई – विधानभवनात शपथविधीसाठी तयारी सुरू
मुख्यमंत्री पदावर चर्चा होत असताना शिवसेना, भाजपमध्ये बैठकांचे सत्र
असे असताना विधानभवनात मुख्यमंत्री तसेच मंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमासाठी तयारी सुरू
25/11/2024 17:10:59
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री सागर बंगल्यावर, मुख्यमंत्रीपदावर चर्चा
दादा भुसे, शंभुराज देसाई, नीलम गोऱ्हे सागरवर बंगल्यावर घेतली भेट
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा, सर्व आमदारांचे मत
शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेना आमदारांचा आग्रह
25/11/2024 16:39:2
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, लाडक्या बहिणींची प्रार्थना
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी जळगावात महिलांचे महादेवाला साकडे
मुस्लीम भगिनींकडून शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना
25/11/2024 16:14:55
भाजपाची प्रदेश कार्यालयात जिल्हाध्यक्षांची बैठक
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
निकालानंतर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद
25/11/2024 15:19:20
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील पवारांच्या भेटीला
दिलीप वळसे पाटील वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहोचले
25/11/2024 15:5:59
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या भेटीला
खर्गेंच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
राज्यातील पराभवानंतर पहिल्यांदाच खर्गेंची भेट
25/11/2024 14:52:14
भास्कर जाधवांची ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड
सुनील प्रभूंची पुन्हा प्रतोपपदी निवड
25/11/2024 13:43:3
बॅार्डर गावस्कर ट्रॅाफी मालिकेत भारताची विजयी सुरुवात
पर्थ कसोटीत भारताचा कांगारुंवर 295 धावांनी दणदणीत विजय
पर्थ कसोटीत भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
भारतीय संघाकडून 47 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
25/11/2024 13:22:32
उत्तरप्रदेशातील संभलमध्ये हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू
जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान रविवारी हिंसाचार
एसपींसह 22 पोलीस जखमी
21 जण अटकेत तर 400 जणांविरोधात एफआयआर
25/11/2024 13:12:27
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे फडणवीसांच्या भेटीला
फडणवीसांची भेट घेण्यासाठी शरद सोनावणे सागर बंगल्यावर पोहोचले
25/11/2024 12:22:10
महाराष्ट्रातील आचारसंहिता संपली
आयोगाने विजयी उमेदवारांची अंतिम यादी राज्यपालांकडे केली सुपूर्द
25/11/2024 11:34:55
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात मनसेची बैठक पार पडली
निवडणुकीतल्या पराभवानंतर शिवतीर्थवर पार पडली मनसेची चिंतन बैठक
मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हिएमबाबत प्रश्न उपस्थित
25/11/2024 11:6:12
अंदमानच्या समुद्रातून सुमारे पाच टन ड्रग्ज जप्त
एका मासेमारी बोटीतून सुमारे पाच टन ड्रग्ज जप्त
भारतीय तटरक्षक दलाची माहिती
25/11/2024 11:4:39
मुंबईतील विलेपार्ले येथे कारच्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची माहिती
या प्रकरणी वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात
25/11/2024 11:2:3
कोल्हापुरात अदमापुर येथे सिनेस्टाईल गोळीबार
भंगार व्यवसायाच्या वादातून परस्परविरोधी गोळीबार
गावठी पिस्तुलातून एकमेकांवर गोळीबार झाल्याची माहीती
या प्रकरणात पुलाची शिरोली गावातून 12 जणांना अटक
चार जण फरार झाल्याची माहिती
25/11/2024 10:59:48
भंडाऱ्यात खैरलांजी गावाजवळ ट्रक पुलावरून कोसळून एकाचा मृत्यू
ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती
मध्य प्रदेशातील बालाघाटाकडे जाणारा ट्रक पुलावरून कोसळला
25/11/2024 10:36:5
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार
25/11/2024 10:8:34
मातोश्रीबाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
लढता लढता हरलो तरी, हरल्याची खंत नाही
असा आशय बॅनरवर करण्यात आला आहे
लढा माझ्या महाराष्ट्रासाठी, लढाईला माझ्या अंत नाही
25/11/2024 9:50:21
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात उसळी
सेन्सेक्सने पुन्हा गाठला 80 हजारांचा टप्पा
निफ्टीही 350 पेक्षा जास्त अंकांनी वधारला
25/11/2024 9:5:35
अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले
यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन
अजित पवार आणि रोहित पवारांची प्रीतीसंगमावर भेट
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं? – अजित पवार
25/11/2024 9:0:3
ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मातोश्रीवर बैठक
उद्धव ठाकरे साधणार आमदारांशी संवाद
नवनिर्वाचित 20 आमदार आज मातोश्रीवर उपस्थित राहणार
25/11/2024 8:42:41
अंबरनाथमध्ये एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग
अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग
रसिनो फार्मा असे आग लागलेल्या कंपनीचे नाव
सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश
25/11/2024 7:45:50
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू
अदानी आणि वफ्क दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता
20 डिसेंबरपर्यंत संसदेचं अधिवेशन सुरू असणार
25/11/2024 7:36:1