Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : कल्याण - तीन मजल्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

Live Update : कल्याण – तीन मजल्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

Subscribe

कल्याण – तीन मजल्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

कल्याणमधील व्हर्टेक्स या इमारतीला लागली आग

- Advertisement -

वेळीस रहिवाश्यांना बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी नाही

आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश

- Advertisement -

26/11/2024 22:41:25


मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर चारचाकी गाडीला आग

खेरवाडीजवळ भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीला आग लागली

गाडी जाळून खाक, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

26/11/2024 21:47:9


कल्याण – वायले नगर परिसरात एका इमारतीला आग

व्हर्टेक्स इमारतीच्या 13 व्या महाल्यावर आग

इमारतीच्या सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात यश

26/11/2024 18:26:0


बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने फेटाळली याचिका

जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा जगन मोहन रेड्डी जिंकतात तेव्हा बोलत नाहीत, पण हरले की, ईव्हीएमची तक्रार करतात, असे म्हणत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली

के ए पॉल यांनी दाखल केली ईव्हीएमबाबत तक्रार करणारी जनहित याचिका

26/11/2024 18:21:29


ड्रग्सच्या नशेत चिमुरडीवर अत्याचाराची घटना; अमित ठाकरे संतप्त

सायन कोळीवाड्यातील घटनेवर अमित ठाकरे संतप्त

याप्रकरणी कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर, अमित ठाकरेंचा इशारा

26/11/2024 18:15:33


नागपूरमधील एका शाळेच्या वाहनाचा अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू

नागपुरातील सरस्वती शाळेच्या सहलीच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती

अपघातातील मृत विद्यार्थींनीला देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करून श्रद्धांजली

26/11/2024 15:2:22


हैदराबादमध्ये पुऱ्या खाताना शाळकरी मुलाचा मृत्यू

एकाच वेळी तीन पुऱ्यांचा घास घेतल्याने श्वास गुदमरला

सहावीमध्ये शिकणाऱ्या विरेन जैन नावाच्या मुलाचा मृत्यू

26/11/2024 14:25:47


भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील राणेंसह अनेक पदाधिकारी उपस्थित

भाजपाच्या आगामी निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा

26/11/2024 13:28:4


आमदार अबू आझमी अजित पवारांच्या भेटीला

26/11/2024 12:51:10


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण केला – पवार गट

मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा पवार गटाचा आरोप

26/11/2024 12:19:42


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींच्या भेटीला

मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि नाना पटोलेंमध्ये बैठक

संसद भवनातील कार्यालयात बैठक सुरू

26/11/2024 11:50:36


सह्याद्रीवर थोड्याच वेळात पत्रकार परिषद

26/11/2024 11:38:9


दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा

26/11/2024 11:24:54


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा

एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांची राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक

26/11/2024 11:17:22


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात पोहचले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजभवनात पोहचले

26/11/2024 10:37:41


हे बहुमत यंत्रणा आणि पैशाचा वापर करून आलंय – संजय राऊत

26/11/2024 9:38:26


मध्य रेल्वे 30 ते 35 मिनिटे उशिराने सुरू

बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला गेले होते तडे

रुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू

26/11/2024 9:22:18


शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक

मातोश्रीवर आज पराभूत उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन

उद्धव ठाकरे करणार उमेदवारांना मार्गदर्शन

26/11/2024 9:19:45


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची बैठक

आज सकाळी 11 वाजता वाय बी सेंटरमध्ये बैठकीचे आयोजन

शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

26/11/2024 9:16:15


26/11 च्या शहिदांना पोलीस मुख्यालयात मानवंदना

शहिदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

सर्वात प्रथम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण

26/11/2024 8:59:8


विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत – ठाकरे गट

ठाकरे गटाची पत्राद्वारे सचिवालयाकडे मागणी

26/11/2024 7:57:14


रश्मी शुक्ला आज राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार

रश्मी शुक्ला आज पुन्हा पोलीस महासंचालक

26/11/2024 7:42:20


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार

26/11/2024 7:31:45


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -