Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक निर्णय, 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

Live Update : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक निर्णय, 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक निर्णय, 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश

- Advertisement -

27/11/2024 21:50:8


वसई रोड रेल्वे टर्मिनसची मागणी मान्य, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

- Advertisement -

नवीन टर्मिनसमध्ये 4 प्लॅटफॉर्म, नवीन टर्मिनस इमारत बांधणार

27/11/2024 19:49:44


शिवसेना ठाकरे गटाचा महापालिका निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

महापालिकेच्या निवडणुका या जर मतपत्रिकेवर घेतल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

27/11/2024 19:13:3


कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही : मनोज जरांगे

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा दावा सोडल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

27/11/2024 18:44:2


टिळक भवनात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक

नाना पटोले, विजय वडेट्टीवार देखील बैठकीला उपस्थित

प्रतोद निवडीचे अधिकार अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे

27/11/2024 17:20:7


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार

एकनाथ शिंदे कर्तबगार व्यक्तीमत्त्व असल्याचे म्हणत बावनकुळेंनी केले कौतुक

27/11/2024 16:55:6


काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

हा अत्यंत मोठा विजय आहे, असा विजय गेल्या काही वर्षात पाहायला मिळाला नाही – एकनाथ शिंदे

महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला

मुख्यमंत्री शिंदेंच्या निवडणुकीत 90-100 सभा

अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप खूश आहे.

लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख

माझ्या लाडक्या बहिणींनी मला ओळख दिली

मी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो

आम्ही रडणारे नाही तर लढून काम करणारे लोक आहोत

महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात काय सुख मिळवून देऊ शकतो, हा आमचा उद्देश होता

रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेसाठी काम करणार – एकनाथ शिंदे

अडिच वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकार भक्कमपणे पाठिशी होते – मुख्यमंत्री शिंदे

पंतप्रधान मोदी आणि शहांना फोन करून सांगितले की, सरकार बनवताना तुम्हाला माझ्यामुळे किंवा अन्य कोणामुळे अडचण आहे, असे मनात आणू नका,

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांवर सोपवला

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजप घेईल. भाजपचा निर्णय मान्य राहील : एकनाथ शिंदे

27/11/2024 15:52:19


काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची 03 वाजता पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेतून शिंदे महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

27/11/2024 14:21:15


राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट

महाराष्ट्र्रातील महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केल्याची तटकरेंची माहिती

सुनील तटकरेंसोबत खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित

27/11/2024 13:16:42


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजही विरोधकांचा गदारोळ

अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांचा संसदेत गदारोळ

संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांची घोषणाबाजी

27/11/2024 11:48:5


मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई भागातील इमारतीला भीषण आग

वीरा देसाई परिसरातील चित्रकूट गार्डनच्या समोरील रहिवाशी इमारतीत आग

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घराला भीषण आग

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली असून पोलिसांनी तत्काळ इमारत खाली केली

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

27/11/2024 9:31:35


बॉलिवूड रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर

बादशाहच्या चंदीगडमधल्या रेस्टॉरंटच्याबाहेर गावठी बॉम्बचा स्फोट

बिश्नोई गँगने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी

27/11/2024 8:51:19


नाशकातील निफाड तालुक्यात थंडीचा कडाका

निफाडचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर

यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात

27/11/2024 8:47:45


बॉलिवूडचे लेखक, दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

जलज धीर असे अपघातात मृत्यू झालेल्या 18 वर्षाच्या मुलाचे नाव

निर्मात्याच्या मुलाचं 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत एका रस्ते अपघातात निधन

अपघातात जलज याच्या आणखी एका मित्राचं देखील निधन

विलेपार्ले येथे 120-150 मैल प्रतितास वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर गेली आणि सर्व्हिस रोड आणि डिव्हायडरला धडकली या दुर्दैवी घटनेत जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिक यांचा मृत्यू

27/11/2024 8:8:2


नवनिर्वाचित आमदारांपैकी 65 टक्के आमदारांवर गुन्हे

भाजपाच्या 132 पैकी 92 आमदारांवर म्हणजेच 92 टक्के आमदारांवर गुन्हे दाखल, 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल

118 म्हणजेच 41 टक्के आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद

27/11/2024 8:8:2


पश्चिम रेल्वेवर बुधवारपासून नव्या 13 लोकलफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय

या फेऱ्या अंधेरी, वांद्रे आणि भाईंदर स्थानकातून धावणार

या स्थानकातून गर्दीमुळे एसी लोकलमध्ये प्रवेश करू न शकणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार

वाढीव लोकलफेऱ्या सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येणार

या अधिकच्या फेऱ्यांमुळे सर्वसामान्यांचा त्रास मात्र वाढणार

27/11/2024 8:8:2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -