अंधेरी अंबोली येथील हिंदू स्मशानभूमीतील दहनकक्ष 1 डिसेंबर 2024 पासून तात्पुरता बंद
पारंपरिक दहनकक्ष दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरता बंद राहणार
या काळात नैसर्गिक वायू अंत्यविधी दाहिनी सेवा कार्यरत असणार
29/11/2024 17:49:52
निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
निवडणूक आयोगाला भाई जगताप यांनी दिली श्वानाची उपमा
29/11/2024 17:46:51
यंदाचा गदिमा पुरस्कार आशा काळेंना जाहीर
प्रिया बेर्डेंना यंदाचा गृहिणी सखी सचिव पुस्कार जाहीर
14 डिसेंबरला होणार पुरस्काराचं वितरण
29/11/2024 17:19:34
काँग्रेस नेते विश्वजित कदम बाबा आढाव यांच्या भेटीला
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यातील भिडे वाज्यात उपोषण सुरू
29/11/2024 16:40:20
डोंबिवलीत ईव्हीएमच्या 10 मशीनची पुन्हा मतमोजणी होणार
दीपेश म्हात्रेंच्या अर्जानंतर पुन्हा होणार मतमोजणी
डोंबिवली मतदारसंघातून रवींद्र चव्हाणांनी दीपेश म्हात्रेंचा 70 हजार मतांनी पराभव केलाय
दीपेश म्हात्रे ठाकरे गटाचे उमेदवार
29/11/2024 16:10:2
गोंदियामध्ये शिवशाही बस उलटून बारा जणांचा मृत्यू
गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये शिवशाही बस उलटली
या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे
खजरी गावाजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
29/11/2024 13:44:19
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाहीप्रकरणी 9 डिसेंबरला सुनावणी
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 9 डिसेंबरला पुढील सुनावणी
29/11/2024 11:38:49
चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले
सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेची बैठक
29/11/2024 11:21:0
राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपर्यंत तहकूब
2 डिसेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज तहकूब
राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ
29/11/2024 11:18:1
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीचा छापा
शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझमधील घरी ईडीचा छापा
पॅार्नोग्राफी केससंदर्भात मुंबई आणि उत्तरप्रदेशासह 15 ठिकाणी छापे
29/11/2024 11:10:35
भांडुपमधील नामांकित शाळेत 10 ते 11 वर्षांच्या तीन मुलींसोबत गैरवर्तन
शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकने गैरवर्तन केल्याचा आरोप
पालकांच्या तक्रारीनंतर पॅाक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात
29/11/2024 10:51:30
वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर
राज्य सरकारचा मोठा निर्णय
वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसेच बळकटीकरणासाठी निधी
अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जाहीर
29/11/2024 8:53:14
राज्यातील पाच जिल्हा परिषदेची मुदत लवकरच संपणार
35 पंचायत समित्याचींही मुदत लवकरच संपणार
29/11/2024 8:11:37
महायुतीच्या तीनही नेत्यांची आज मुंबईत बैठक
अमित शहांच्या सूचना आणि निर्णय याबाबत आज बैठकीत चर्चा होणार
महायुतीच्या तीनही नेत्यांची अमित शहांसह रात्री उशिरा बैठक
मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत कालच्या बैठकीत चर्चा
29/11/2024 7:19:22