घरदेश-विदेशLive Update : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे मुंबईतील ईडी...

Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन 

Subscribe

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन

आमचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेचा आम आदमी पक्षाकडून निषेध करण्यात आला

- Advertisement -

21/3/2024 23:9:3


काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- Advertisement -

रवींद्र धंगेकरांना काँग्रेसमधून उमेदवारी

नांदेडमधून वसंत राव चव्हाण

21/3/2024 21:19:24


अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दोन तासांच्या चौकशी केजरीवाल यांना अटक

21/3/2024 20:40:22


उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर

21/3/2024 20:20:1


ई़डीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी

दुपारी दिल्ली हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचं पथक केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं

21/3/2024 19:6:47


डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

21/3/2024 19:4:21


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

वाईवरून मुंबईला येत असताना कंटेनरची आठवलेंच्या गाडीला धडक

अपघातात रामदास आठवले सुखरुप, दुखापत नाही

21/3/2024 19:2:32


भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

के अन्नामलाई कोईम्बतूरमधून, तमिलिसाई सुंदरराजन दक्षिण चेन्नईतून आणि एल. मुरुगन निलगिरीतून निवडणूक लढवणार

21/3/2024 18:15:38


ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार

21/3/2024 16:26:6


अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तीच्या कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला

न्यायालयाने अंतरिम याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले आहे

पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार

21/3/2024 16:19:50


उद्धव ठाकरे शाहू पॅलेसमध्ये दाखल

उद्धव ठाकरेंनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट

21/3/2024 15:46:34


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर पोहोचले

उद्धव ठाकरे आज छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार

ठाकरेंचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा

21/3/2024 15:28:44


राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस यांच्यातील बैठक संपली

तिन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून सुरू होती बैठक

21/3/2024 12:38:50


काँग्रेसची गोठवलेली खाती खुली करण्याची मल्लिकार्जुन खर्गेंची मागणी

काँग्रेसची विशेष पत्रकार परिषदेतून मागणी

पत्रकार परिषदेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, जयराम रमेश यांच्यासह अन्य नेते उपस्थित

21/3/2024 12:0:39


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची ताज लॅन्ड हॉटेलमध्ये बैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला राहणारा उपस्थित

मनसे आजच महायुतीत सहभागी होण्याची शक्यता

21/3/2024 11:7:2


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भावना खासदार गवळींनी बोलावली बैठक

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती

दुपारी 2 वाजता भावना गवळींच्या निवासस्थानी होणार बैठक

21/3/2024 10:59:37


मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के

नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

21/3/2024 7:45:16


महायुतीच्या जागा वाटपासाठी आज नवी दिल्लीत बैठक

गेल्या काही दिवसांपासून रखडलेले जागा वाटप पूर्ण होणार

भाजपाने यापूर्वीच आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर नाही

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग अलर्ट

आयोगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी लावलेले होर्डिंग्ज, बॅनर 24 तासांत हटवण्याचे आदेश

आयोगाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार

21/3/2024 7:39:14


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

दौऱ्याला सुरुवात करण्याआधी उद्धव ठाकरे घेणार छत्रपती शाहू महाराजांची भेट

या भेटीत छत्रपती शाहू महाराजांसोबत कोल्हापुरच्या जागेविषयी चर्चा करण्यात येणार

21/3/2024 7:39:14


ठाणे जिल्ह्यात आगीची मोठी घटना

डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात मध्यरात्री दोन ते तीन वाजता भीषण आग

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दहा ते बारा गाड्यांचे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही

21/3/2024 7:39:14

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -