घरदेश-विदेशLive Update : गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक

Live Update : गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक

Subscribe

गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक

60 किलो गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे वाहतुक करणाऱ्या 4 आरोपीतांना अटक

- Advertisement -

CSMT  जंक्शनवर मॅकडोनाल्डसमोर अपघाताची घटना घडली आहे. दिलीप चटवाणी नावाच्या 80 वर्षीय व्यक्तीने टाटा टियागो चारचाकी गाडी चालवत 17 ते 18 वयोगटातील 4 मुलांना संध्याकाळी 7.30 च्या सुमारास धडक दिली.
आरोपी माहीम येथे राहतात आणि मशीद बंदर येथे मेटल ट्रेडिंग व्यावसायिक असून त्याचे दुकान असून ते घरी जात होते.
पीडित मुले कुलाबा येथून आली होती, जिथे ते फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते आणि ट्रेनमध्ये चढण्यासाठी सीएसटी स्टेशनला जात होते.

त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पीडितांचा तपशील –
१) विजय रामवध राजभर वय १८ वर्ष रा. B.P.T मैदान, रे रोड
२) सदाम अन्सारी वय १७ वर्ष
३) अजय गुप्ता वय १८ वर्ष
४) प्रवीण वय १८ वर्षे
जयभीम नगर, शिवडी P Stn


चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय धावपटू पारूल चौधरी हिनं महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिच्या ह्या सुवर्ण कामगिरीनं जागतिक पटलावर आपल्या देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. पारूलनं काल (सोमवार) ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक आपल्या नावी केलं होतं. त्यानंतर आज जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिनं हे ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. तिचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!


नांदेड रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; मृतांचा आकडा 35 वर

अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत दिली माहिती.


रोहित पाटील यांचे उपोषण मागे; फडणवीसांनी फोन करून आश्वासन दिल्यानंतर घेतला निर्णय

रोहित पाटील आणि सुमन पाटील यांचे उपोषण मागे

1 महिन्यात टेंभूला सुधारित मान्यात देऊ, असे आश्वासन फडणवीसांनी दिले


मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना

वरिष्ठांच्या भेटीसाठी दोघेही दिल्ली दौऱ्यावर

राजतीय सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची ठरत आहे


नांदेड प्रकरणात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मागवला अहवाल


२ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार, तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी
130 सरपंचांच्या रिक्तपदांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय

गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. 45 पदांनाही मंजुरी.

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.

विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.


दिल्लीच्या एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

नेपाळ हा भूकंपाचा केंद्रबिंदू


उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर

अजित पवार आजारी असल्यामुळे बैठकीला गैरहजर असल्याची सूत्रांकडून माहिती

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अनेक बैठकींना गैरहजर


सुरतमधील बॉम्बे मार्केटमध्ये भीषण आग

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही


आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात धनगर समाज आक्रमक

मोहोळमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको

मेंढ्या रस्त्यावर उतरवत धनगर बांधव आक्रमकपणे आंदोलन

सर्वपक्षीय धनगर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात चौकशी समिती दाखल

रुग्णांच्या मृत्यूची सखोल चौकशी होणार


नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावाला पुन्हा सुरुवात

तब्बल 14 दिवसांनंतर कांदा लिलावाला सुरुवात

कांद्याला सर्वसाधारण प्रति क्विंटल 900 रुपये दर


पनवेलकडे जाणार्‍या हार्बर आणि ट्रान्सहार्बर उपनगरीय गाड्या बेलापूर-पनवेल विभागादरम्यान 30 मिनिटे उशिराने

पनवेल येथे सकाळी 05.35 ते 07.25 दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल गाड्या उशीराने

नेमक्या सकाळच्या वेळी बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत केला प्रवेश

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून नेपाळचा 23 धावांनी पराभव

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारत वि. नेपाळमध्ये सामना खेळला गेला

यावेळी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले

असा पराक्रम करणारा यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरला


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली माहिती


दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांची धाड

पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल जप्त

संजय राजोर, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ यांच्या घरी धाड


कोकण रेल्वे मार्गावर नागेरकोइल – पनवेल विशेष गाडी उद्या धावणार

सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार

आज मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल. त्यानंतर ही गाडी उद्या बुधवार 4 ऑक्टोबर रोजी पनवेल येथून सकाळी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता नागरकोईल येथे पोहोचेल.


उत्तर भारतातून पावसाच्या परतीला प्रवासाला सुरुवात

अनेक राज्यांमध्ये पावसाने केला कहर

राज्यासह देशात काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची व्यक्त केली शक्यता

पुढील 24 तासांत महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या इतर शहरांमध्ये ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू

राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

भाजप सरकार हजारो कोटी प्रचारावर खर्च करते, पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न


आज पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक

सकाळी 11 वाजता कौन्सिल हॉलला बैठकीचं आयोजन

बैठकीत मराठा ,कुणबी मराठा,वायंदेशी मराठा यांच्याबाबत चर्चा होणार

आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या मागण्यावर होणार चर्चा

आयोगाचे अध्यक्ष आणि सगळे सदस्य राहणार उपस्थित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -