पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव
नऊ सामन्यांपैकी पाच वेळा पराभव
उद्धव ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू
पोलीस ठाकरेंना शाखास्थळी जाण्यापासून रोखत आहेत
उद्धव ठाकरे, संजय राऊत वाहनातून खाली उतरले
आता ते शाखेजवळ जातात की, मंचावर जातात हे पहावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे मुंब्र्यातील शाखा स्थळी दाखल
अद्यापही वाहनातच बसून, पोलीस आणि नेत्यांमध्ये चर्चा सुरू
उद्धव ठाकरेंचे मुंब्र्यात जल्लोषात स्वागत
काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
ठाण्यातील रेतीबंदर परिसरात उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत, जेसीबीतून फुलांची उधळण
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरेंचे ठाण्यात जंगी स्वागत
उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल
उद्धव ठाकरे मातोश्रीवरून मुंब्य्राच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्र्याच्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन
ठाकरेंच्या या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी होणार दाखल
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घेतली भेट
Enjoyed a delightful Diwali visit to Union Minister Shri Nitin Gadkari ji’s residence in Nagpur! Grateful for the festive cheer and warm hospitality.@nitin_gadkari@mahancpspeaks#DiwaliCelebrations #MemorableMoments#HappyDiwali pic.twitter.com/Zj35MPuPMv
— Praful Patel (@praful_patel) November 11, 2023
मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलाचा सरकारविरोधात सिल्लोडमध्ये मोर्चा
सिल्लोड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची समीर सत्तारांची मागणी
कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा
गोकुळ दूध संघा कार्यालयासमोर ठाकरे गटाचा मोर्चा
पोलिसांकडून ठाकरे गटाचा मोर्चा अडवला
पोलिसांकडून ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
मुंबईत वायू प्रदूषणात पुन्हा वाढ
गेले दोन दिवस हवेतील गुणवत्ता सुधारलेली असताना आज पुन्हा हवेची गुणवत्ता ढासाळली
पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस
पावसामुळे शेतात साचले पाणी
अवकाळी पावसाचा फटका काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कार्यकारणी बिनविरोध
पुणे शाखेच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध
एकूण 19 जणांची बिनविरोध निवड
2023 ते 2028 या कालावधीसाठी कार्यकारणी काम करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट
‘एबंडेंस इन मिलेट्स’ असे गाण्याचे नाव
धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यासाठी लिहिले गाणे
या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये मिळाले नामांकन
पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील दरी पुलावर चार वाहनांचा अपघात
मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस,टेम्पो आणि कारला धडक
पावणे चार वाजताच्या सुमारास नवले पुलाजवळ हा अपघात घडल्याची माहिती
घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून अडकलेल्या दोन गंभीर जखमींना बाहेर काढत रुग्णालयात पाठवले असल्याची माहिती