लोकसभेचे कामकाज शुक्रवार सकाळी 11 पर्यंत स्थगित
काँग्रसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला
मोदीचं भाषण सुरू असताना विरोधकाचा सभात्याग
अविश्वास प्रस्ताव आमची नाही तर विरोधकांची बहुमत चाचणी – नरेंद्र मोदी
गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाची विधेयक मात्र विरोधकांचा विरोध
विरोधकांना गरीबांच्या भूकेची नाही तर, त्यांच्या डोक्यात सत्तेची भूक
देशापेक्षा विरोधकांना पक्ष मोठा आणि महत्त्वाचा वाटतो
Who ने म्हटलं, जलजीवन मिशनमुळे 4 लाख लोकांचा जीव वाचला
स्वच्छ भारत मिशनमुळे 3 लाख लोकांचे प्राण वाचले
5 वर्षात 13 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात दाखल
पंतप्रधान मोदींच्या संसदेतील उत्तरानंतर अधीररंजन चौधरी पत्रकार परिषद घेणार
लोकसभेत विरोधकांचा सभात्याग
काँग्रसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरींचे मोदींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य
विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नीरव मोदीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चॉपरचे इमर्जन्सी लँडींग
मुख्यमंत्री रस्ते मार्गे दरे गावी जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 4 वाजता संसदेत भाषण करणार
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावार पंतप्रधान मोदी उत्तर देणार
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीत ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री
सरन्यायाधिशांऐवजी ज्येष्ठ मंत्र्यांचा निवडणूक आयोगात समावेश करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
मुंबईत भाजपच्या महिलांकडून राहुल गांधींविरोधात मोर्चा
राहुल गांधींनी काल संसदेत भाजपच्या महिला खासदारांना पाहूल ‘फ्लाईंग किस’ दिल्याच्या निषेधार्थ काढण्यात आला मोर्चा
संसदेतील मतदानासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून काढण्यात आले व्हीप
शरद पवार गटाकडून फैजल यांनी तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरेंनी काढला व्हीप
आरबीयआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पतधोरण जाहीर
बँकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याची दिली माहिती
रेपो रेट 6.5 टक्के कायम राहणार असल्याची माहिती
व्याजदरातही कोणतेही बदल होणार नाहीत
राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर
पुण्यात संघटनात्मक बैठका घेणार असल्याची माहिती
मणिपूरमधील महिला अत्याचारांच्या घटनेबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यपालांची भेट घेणार
दानवे यांच्यासोबत युवती सेनेचे शिष्टमंडळ देखील असणार भेटीला
राजभवनात दुपारी 2 वाजता घेणार भेट
साताऱ्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात
कार झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू
अपघातात 5 जण गंभीर जखमी
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावार आज (ता. 10 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार
आज अविश्वास प्रस्तावावरील तिसरा दिवस
काल (ता. 09 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला
तर राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सडेतोड उत्तर दिले
2018 मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद केली बरखास्त
संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंबलीचा पाच वर्षाचा संवैधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही आला संपुष्टात
नॅशनल असेंबली संविधानाच्या आर्टिकल 58च्या नुसार भंग करण्यात आली असल्याची माहिती
भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानचा 4-0 ने केला पराभव
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सामना एकतर्फी जिंकला
या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने केले 2 गोल
जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी केला प्रत्येकी एक गोल
आज आरबीआयकडून पतधोरण जाहीर केले जाणार
आरबीआयकडून आज सकाळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पतधोरण जाहीर केले जाणार
महागाई संदर्भात सविस्तर माहिती शक्तिकांत दास यांच्याकडून सादर केली जाणार
अमेरिकी फेडररकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्यानं आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाची) आज दुपारी 3 वाजता प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक
बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित राहणार
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होण्याची शक्यता
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गोंदिया आणि भंडारा जिल्हा दौऱ्यावर
गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक होणार
दुपारी 1.30 वाजता विजय वड्डेटीवार पत्रकार परिषद घेतील