11/8/2023 22:39:0 भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये
जपानचा केला 5-0ने पराभव
फायनलमध्ये मलेशियाशी होणार लढत
11/8/2023 21:17:40 सना खान हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत
सना खान यांचे पती अमित साहूंचा नोकर जीतेंद्र गौड पोलिसांकडून अटक
11/8/2023 21:17:40 इसिसशी संबंधित प्रकरणात एनआयकडून सहावी अटक
गँगस्टर साकिब नाचनचा मुलगा शामिल नाचन एनआयएच्या अटकेत
शामिल नाचन पुण्यातून अटक केलेल्या 6 आरोपींच्या संपर्कात असल्याचे एनआयएने म्हटले आहे.
11/8/2023 18:50:24 पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजपात नाराजीनाट्य
लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून आणि पोस्टर्सवर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता त्यांनी ट्विटरवरून टीका केली
चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यातल्या भाजपात नाराजीनाट्य रंगल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे
11/8/2023 18:50:24 मणिपूर हिंसाचार प्रकरणी भंडाऱ्यात ख्रिश्चन समुदायाकडून मूक मोर्चातून न्यायाची मागणी
या मोर्चात शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते
मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व ख्रिश्चन बांधवांनी काळ्या फितही लावल्या होत्या
भाजपा कार्यकर्त्या सना खान हत्याप्रकरणात पती अमित साहूला अटक
अमित साहूवर सना खानच्या हत्येचा संशय
म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत जाहीर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली
चित्रपट अभिनेत्री, माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा
जया प्रदा यांच्यासह तिघांना 6 महिन्यांची शिक्षा
प्रत्येकाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मिळाला जामीन
तब्येतीच्या कारणास्तव सुप्रीम कोर्टाने दिला जामीन
दोन महिन्यांसाठीचा कोर्टाकडून जामीन मंजूर
पंतप्रधानांनी काल मणिपूरच्या घटनेवर हसत भाषण केले
भारताच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीने बोलणे चुकीचे
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
आपचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांचे निलंबन
प्रस्तावात फेरफार केल्याने निलंबनाची कारवाई
दिल्ली सेवा विधेयकाबाबत प्रस्तावात 5 खासदारांची नावे न विचारता जोडल्याने केली कारवाई
लोकसभेत नीरव नावाने विरोधकांची घोषणाबाजी
हरियाणा में नीरव, मणिपूर में नीरव, लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी
सर्व महापालिकांनी कामांबाबतचे प्रतित्रापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश
प्रत्येक वॉर्डसाठी उच्च न्यायालयाच्या वकिलाची नियुक्ती करण्यात येणार, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आणि मॅनहोल्ससंबंधी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीला सुरुवात
6 महानगरपालिकांच्या आयुक्तांना या प्रकरणात बजावण्यात आले होते समन्स
6 महापालिका आयुक्त कोर्टात हजर
राहुल गांधींची आज दुपारी पत्रकार परिषद
दुपारी 3 वाजता होणार पत्रकार परिषद
लोकसभेचे आजचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आणि मॅनहोल्ससंबंधी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीला सुरुवात
6 महानगरपालिकांच्या आयुक्तांना या प्रकरणात बजावण्यात आले होते समन्स
6 महापालिका आयुक्त कोर्टात हजर
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
मणिपूरमध्ये वाढली बुलेट प्रूफ जॅकेटची मागणी
एका जॅकेटची किंमत साधारणतः 3 हजार ते 3 हजार 500 रुपयांपर्यंत
याआधी एका महिन्यात दोनपेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेटची विक्री नव्हती
आता एका महिन्यात 30 ते 50 जॅकेटची विक्री
जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्टपासून करणार जपान दौरा
महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न
उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण
फडणवीस यांचा हा दौरा पाच दिवसांचा असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. 12 ऑगस्ट) मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर
मोदींच्या हस्ते होणार विविध कामांचे उद्घाटन
संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार
पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान, 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील
अनेक महिन्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद
रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाल्याने मृत्यू
मृत व्यक्ती 75 वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोगाने पीडित असल्याची माहिती
मुंबईत 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
ऑगस्ट महिन्यामधील ही दुसरी वेळ आहे की शहरात कोविड प्रकरणे दुहेरी अंकात नोंदविण्यात आली