कुर्ल्यातील नारायण नगर येथे इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग
या आगीच्या घटनेनंतर दोन फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले
सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू
मनसे कार्यकर्त्यांकडून राजापूर टोलनाक्यावर तोडफोड
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसे आक्रमक
उद्धव ठाकरेंची येत्या 27 ऑगस्टला हिंगोली येथे जाहीर सभा
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर दुपारी 3 वाजता होणार सभा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 27 तारखेला मराठवाडा दौऱ्यावर जाणार
सुजीत पाटकर सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत
ईडीकडून आर्थिक गुन्हे शाखेने पाटकरांना घेतले ताब्यात
सुजीत पाटकर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय
नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू
बोर्डिंद गेटजवळ इंडिगो कंपनीच्या वैमानिकाचा मृत्यू
हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात टाकण्याचं राजकारण सुरू – शरद पवार
चुकीच्या लोकांना आवरायची वेळ आली – शरद पवार
सत्तेमागे जा, पण माणुसकी विसरू नका – शरद पवार
पंतप्रधानांनी मणिपूरला जायची आवश्यकता होती – पवार
विचारांशी फारकत घेऊन सत्ता जवळ करण्याचे काम सुरु – जयंत पाटील
सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. सत्तेसाठी काही करण्याचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. बीडमध्ये सर्वांनीच शरद पवार यांचे पोस्टर लावले. सर्वांनाच त्यांच्या आशिर्वादाची गरज असल्याचा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला लगावला.
महाराष्ट्र धर्मासाठी, विचारासाठी संघर्ष करणार- रोहित पवार
बलाढ्य शक्तीशी, भाजपविरोधात लढाई सुरु आहे – रोहित पवार
मला खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले – अनिल देशमुख
मी 14 महिने तुरुंगात होतो. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयच्या वापर करण्यात येत आहे. हे सरकार देशाचा विनाश करेल, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
बीडमधील शरद पवार यांच्या रॅलीला सुरुवात
शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल
शिर्डीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित
शरद पवार यांच्या सभेसाठी परळीतून 700 गाड्यांचा ताफा बीडकडे रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर
ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा
बीडमधील माने कॉम्प्लेक्स परिसरात दुपारी 12 वाजता होणार सभेला सुरुवात
सभेत 40 ते 45 हजार कार्यकर्ते बसतील अशी करण्यात आली मंडप व्यवस्था
सभेत शरद पवार काय बोलणार यांकडे सर्वांचे लक्ष
बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला
हिमाचल प्रदेशात भुस्खलनामुळे गेले 71 जणांचे प्राण
हिमाचल प्रदेशात भुस्खलनामुळे गेले 71 जणांचे प्राण
पुरामुळे झाले 7 हजार 500 कोटींचं नुकसान
पुरात वाहून लोकांचे संसार झाले उद्ध्वस्त
आजपासून राज्यभरात तलाठी परीक्षेला होणार सुरुवात
एकूण 4 हजार 644 जागांसाठी होणार भरती
14 सप्टेंबर पर्यंत ही भरती सुरू राहणार
टाटा कन्सलटन्सी (टीसीएस ) कंपनी उमेदवारांची परीक्षा घेणार
अवघ्या 04 हजार पदांसाठी साडे दहा लाख आले अर्ज
सर्वाधिक अर्ज पुण्यातून आणि वाशिम जिल्ह्यातून आल्याची माहिती
पुण्यात डोळ्यांची साथ
डोळ्यांच्या साथीने त्रस्त असलेल्या 52 हजार रुग्णांची पुण्यात नोंद