घरदेश-विदेशLive Update : विराट कोहली दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, अनुष्का शर्माने दिला मुलाला...

Live Update : विराट कोहली दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म

Subscribe

विराट कोहली दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विराटने आपल्या मुलाचे नाव अके असे ठेवले आहे.

- Advertisement -

मंत्रिमंडळात अभ्युदय नगरचा सीएनडी प्रस्ताव मांडणार – देवेंद्र फडणवीस

लवकरच नव्या 35 मागण्या पूर्ण करणार

- Advertisement -

ठाकरे सरकारने गरिबांच्या घराचं स्वप्न गुंडाळलं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली


दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ल्यात रोहित पवारांचे बॅनर

“वादा तोच, पण दादा नवा” अशा आशयाचे बॅनर लागले आहेत


शरद पवारांनी घेतली शाहू महाराज छत्रपतींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात शाहु महाराज छत्रपतींची भेट घेतली. यावेळी पवार यांनी कालच्या कार्यक्रमात त्यांची भेट न झाल्यानं त्यांच्या भेटीला आलो असल्याचे म्हटले आहे.


पुण्यात 1100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; पोलिसांची कारवाई

रयानस शास्त्रज्ञासह तीन जणांना अटक

कुरकुंभ MIDC मधील कारखान्यातून 550 किलो ड्रग्ज जप्त


चंदीगड महापौर निवडणुकीत पुन्हा मतमोजणी

सर्वोच्च न्यायालायचे मतमोजणीचे आदेश

रद्द केलेली 8 मते वैध


कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण : समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात 1 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातही समीर वानखेडेंना अटकेपासून दिलासा


नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवले

अशोक नजन असे पोलीस निरीक्षकाचे नाव


विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन

विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार

मराठा समाजाची लोकसंख्या 27 टक्के असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल

त्याआधारे स्वतंत्र संवर्ग करून 10 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव

दुसरीकडे ओबीसीच नव्हे, तर अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही


शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या संघटनांची आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली आहे

हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी संघटनांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारचा प्रस्ताव मंजूर नसल्याचे म्हटले

मोदी सरकारने जो प्रस्ताव ठेवलाय तो विचारात घेतला तर लक्षात आले की यामध्ये काहीच नाही, असे आंदोलक शेतकऱ्यांचे सांगणे


राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून पुन्हा संपावर जाणार

मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने आंदोलन


केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिल जिल्ह्यात सोमवारी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी असल्याची माहिती

भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस 148 किलोमीटर अंतरावर

भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खाली असल्याची राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -