घरदेश-विदेशLive Update : नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची हकालपट्टी

Live Update : नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची हकालपट्टी

Subscribe

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची हकालपट्टी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांची राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकृत पत्र राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

आरएसएसची वार्षिक सभा मार्चमध्ये

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 15, 16 आणि 17 मार्च रोजी नागपूर येथे होणार. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी दिली माहिती.

- Advertisement -

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य निवड मंडळाची उद्या बैठक

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक गुरुवारी (22 फेब्रुवारी) दुपारी 11.30 वा. टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यनिवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहतील.


जे. पी. नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दादर येथील राजगृहाला भेट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि आमदार कालिदास कोळंबकर देखील उपस्थित होते.


उद्धव ठाकरे गुरुवारपासून विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष यंत्रणा कार्यरत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक दौरे सुरू


नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील कंपनीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल


57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार उद्या

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023’ आणि ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2022’, चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर जीवनगौरव/ विशेष योगदान पुरस्कार यासह 57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाली 6.30 वा. डोम, एनएससीआय, वरळी, मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.


रायगड जिल्हाधिकारीपदी किशन जावळे

रायगड जिल्हाधिकारीपदी असलेले डॉ. म्हसे यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या आता किशन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


दिलीप वळसे पाटील कारवाईला घाबरून भाजपासोबत गेले – रोहित पवार

विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट भाजपाच्या चिन्हावर लढणार, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.


मनोज जरांगेवरील आरोपांनंतर अजय बारसकर प्रहार जनशक्ती पक्षातून बडतर्फ

प्रहार जनशक्ती पक्षाकडून पत्रक अजय बारसकर यांना केलं बडतर्फ


सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांचा शरद पवार गटात प्रवेश


कल्याण स्टेशनवर स्फोटक सदृश्य वस्तू

पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल


अमरावतीत मृद आणि जलसंधारणाचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांमध्ये संताप

अमरावतीत स्पर्धा परीक्षांचा मृद आणि जलसंधारणाचा पेपर फुटला आहे.

पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.


पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदे घे

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक उद्या गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ११.३० वा. टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यनिवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत..

त पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जबाबत माहिती दिली

दिल्लीत 970 किलोंचा साठा जप्त करण्यात आल्याचं ते म्हणाले.


छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमध्ये घटना

अतिक्रमण हटवल्याने नागरिक संतापले


जे. पी. नड्डा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई विमानतळावर पोहोचले

नड्डा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी


मुंबईतील कुर्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे उद्घाटन

मुंबईत शिवरायांचे हे पहिलेच मंदिर असून देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मंदिरात शिवरायांची आरती करण्यात आली


आवाजाचे बादशाह अमीन सयानी यांचे निधन

वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वास

अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची माहिती दिली

वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या अमीन सयानी काळाच्या पडद्याआड


मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकींची हकालपट्टी

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा कारवाई

अखिलेश यादव मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त


नंदुरबारमध्ये भाविकांना प्रसादातून विषबाधा

भगर, आमटी, दूधाच्या प्रसादातून अडिचशेहून अधिक भावांना विषबाधा


कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे निधन

वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


पुणे पोलिसांनी दिल्लीतून 600 किलो अंमली पदार्थ केले जप्त

गेल्या तीन दिवसांत 4 हजार कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

पुणे पोलिसांची आजवरची ही सर्वात मोठी कारवाई


राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

राज्यातील 15 लाख13 हजार 909 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार

परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक

प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार असल्याची माहिती

विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वेळ कमी पडू नये यासाठी शेवटची 10 मिनिटे वाढवून दिली जाणार


इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी दोन मोठे धक्के

केएल राहुल दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर

जसप्रीत बुमराह सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीचे यामार्फत रणशिंग फुंकणार असल्याची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -