मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेच्या भेटीसाठी मातोश्रीवर
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल
इंडिया आघाडीमध्ये विविध पक्षाचे 11 मुख्यमंत्री सहभागी-चव्हाण
इंडिया आघाडीत आता 28 पक्ष सहभागी झाले-अशोक चव्हाण
उद्या मल्लीकार्जुन खडगे, राहुल गांधी बैठकीसाठी येणार-पटोले
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे दाखल
प्रकाश आंबेडकरांनी नोंदवली भीमा कोरोगाव प्रकरणी साक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत साजरे केले रक्षाबंधन
शाळकरी मुलींनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी फारुख अब्दुल्ला मुंबईत दाखल
पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती दौऱ्याला आजपासून सुरुवात
नांदेडमधून पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याला सुरुवात
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
नेरळ ते वांगणी दरम्यान मालगडीचे डबे झाले वेगळे
पिंपरी चिंचवडमधील चिखलीत हार्डवेअर दुकानाला भीषण आग
आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह
कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अतिशय महत्त्व
समुद्राला नारळ अर्पण करून पूजा केल्यानंतर मासेमारीसाठी बोटी निघतात
महाविकास आघाडीकडून ‘इंडिया’च्या बैठकीची तयारी पूर्ण
बैठकीचा भाग म्हणून महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अशोक चव्हाण ही पत्रकार परिषद घेणार
मविआमधील काही नेत्यांना या बैठकीशी संबंधित काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत
प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज हजर राहणार
त्यानंतर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
भंडाऱ्यात वेगळ्या पद्धतीनं रक्षा बंधन साजरा होणार
ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांच्या वतीनं भंडारा शहरात पडलेल्या खड्ड्यांना ओवाळणी करून राखी बांधून कुणाचाही अपघात होऊ नये, किंवा सर्वांचा सुखकर प्रवास व्हावा, यासाठी पूजा करण्यात येणार आहे.