राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक 215 मतांनी संमत
महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शून्य मत
महिलांना 33 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा शनिवारी (23 सप्टेंबर) दुपारी 03:30 वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येणार
लालबागच्या राजाच्या दरबारात केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था उपस्थित असणार आहे.
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर मतदान सुरू
जुडेगा भारत जितेगा इंडिया महाविकास आघाडीकरून उद्या जाहिर सभेचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
शाहरुख खान लालबाग राजाच्या दर्शनाला
शाहरुख खानसोबत त्याचा लहान मुलगा अब्राहम देखील आहे.
विधानसभा अध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर; वरिष्ठ कायदेतज्ज्ञांनी करणार चर्चा
शिंदे आणि ठाकरेंना नार्वेकर नोटीसा पाठवणार आहेत.
धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे.
बैठक निष्फळ ठरल्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
धनगर आणि धनगड याविषयीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. राज्य सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. यासाठी दोन दिवसांत याविषयीची समिती गठीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
—————————————————————————————–
भारत सरकारचा मोठा निर्णय; कॅनडातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसा स्थगित
भारत- कॅनडा तणाव वाढला. कॅनडाच्या नागरिकांना भारतीय व्हिसा मिळणार नाही. खालिस्तानी अतिरेक्यांना पाठिशी घालणाऱ्या कॅनडाला भारतानं धक्का दिला आहे.
——————————————————————————
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज धनगर नेत्यांसोबत सरकारची बैठक
———————————————————————————————-
राज्यसभेत जे. पी. नड्डांकडून महिला आरक्षण विधेयक सादर
राज्यसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा
——————————————————————————————-
पंजाबमधील गँगस्टर सुक्खा दुनिकेची कॅनडात हत्या
कॅनडात चार दिवसात दुसरी हत्या.
——————————————————————————————
राहुल गांधींचा हमालांशी संवाद; हमालांचा गणवेश परिधान करून उचलली बॅग
राहुल गांधी यांनी हमालांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या
————————————————————————————————
महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मंजूर केलं जाणार
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या विधेयकावर राज्यसभेत बोलणार
————————————————————-
आदित्य ठाकरे उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर. मध्य प्रदेशात उद्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण. आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार.
——————————————————————————————
धगनर समाजाच्या आरक्षणाबाबत गुरूवारी बैठक
धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठिकाठिकाणी आंदोलन, रास्ता रोको केलं जात आहे. यादरम्यान आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
शिर्डीजवळील सावळीविहिर गावातील घटना. आरोपी सुरेश निकम पोलिसांच्या ताब्यात. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची माहिती. जावयानं केली धारधार चाकूने पत्नी, मेव्हणा आजे आणि सासूची हत्या.
——————————————————————————————-