मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांना उद्या सुट्टी
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा उद्या बंद राहणार
जिल्ह्यातील एसटी वाहतूक देखील उद्या राहणार बंद
न 2022-23 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
उद्या (5 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, एनसीपीए, नरीमन पॉईंट येथे पुरस्कार सोहळा पार पडणार
वटहुकूम केंद्र सरकार काढतं हे फडणवीसांना माहिती नसेल – उद्धव ठाकरे
फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं वाटतं नव्हत
जालन्यातील घटनेनंतर पुरावे मागत आहे, मग मोदींकडे तुमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागा
साजन पातपुतेंच्या पक्षप्रवेशाने अनेकांच्या पोटात गोळा – उद्धव ठाकरे
साजन पाचपुते ठाकरे गटाच्या उपनेतेपदी
भाजपा आमदार बबन पाचपुते यांचा पुतण्या साजन पाचपुते ठाकरे गटात
मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
रस्त्याचं काम सुरू असताना जलवाहिनी फुटली
एसटी महामंडळाचा आज दिवसभरात सुमारे 2 कोटी 60 लाख रुपये महसूल बुडाला
आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एसटीच्या एकूण बस फेऱ्या पैकी सुमारे 6200 फेऱ्या बंद असल्यामुळे एसटीला नुकसान
गेल्या तीन दिवसात एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे ८ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले
मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 पूर्णतः बंद असल्यामुळे एसटी महामंडळा तोटा सहन करावा लागत आहे.
मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस मागे घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मनोज जरांगे यांना आवाहन मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देणे हा मोठा विषय आहे.
आरक्षण देण्यासाठी सर्वच स्तरावर काम सुरु, महिनाभरात ते पूर्ण होईल.
दुर्दैवाने जालन्यातील घटनेनंतर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – अजित पवार
जालन्यातील घटना चुकीचीच; लाठीमाराचे समर्थन करणार नाही – देवेंद्र फडणवीस
या प्रकरणाची राज्य सरकार उच्चस्तरीय चौकशी करणार
जालना प्रकारानंतर आता सरकार ऍक्शन मोड वर आली आहे. या बाबत सह्याद्री गेस्ट हाऊस वर महत्वाची बैठकीला सुरवात झालीय
कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ,कोणावर ही अन्याय न करता मराठा आरक्षणासाठी मधला मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा होणार आहे
___________________________________________________________________
किशोरी पेडणेकरांना अटकेपासून तुर्तास दिलासा
कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण
मुंबई हायकोर्टानं हा दिलासा दिला आहे.
____________________________________________________________________
लाठीचार्ज प्रकरणी जालन्यात चौकशी समिती दाखल
________________________________________________________________________
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू
___________________________________________________
अजित दादांनी सत्तेतून बाहेर पडावं, बारामतीत घोषणा
_______________________________________________________________________
राज ठाकरे अंतरवली सराटीत दाखल
फक्त घोषणाबाजी करता म्हणून तुम्ही मागे; राज ठाकरे
_________________________________________
उदयनिधी स्टॅनिल यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक
राहुल कनाल यांची पोलिसांत तक्रार
_____________________________________________________________
मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला, jआंदोलकांनी दिलं निवेदन
आंदोलकांची राज ठाकरेंसमोर घोषणाबाजी
____________________________________________________________
आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावे- विजय वडेट्टीवार
किशोरी पेडणेकरांच्या याचिकेवर आज सुनावणी
———————————————————————-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालना दौऱ्यावर, अंतरवाली सराटी गावाला भेट देणार
जालना लाठीचार्ज प्रकरणी राज्यभरात आंदोलनं
जालना, हिंगोली, सातारा, औरंगाबादमध्ये बंदची हाक