Live Update : सलीम हिंगोरा, अब्दुल कयुम यांच्यासह आणखी काही जण NIAच्या ताब्यात

coronavirus cm uddhav thackeray fadanvis bjp gyanvapi masjid sambhaji raje sanjay pawar pm modi
coronavirus cm uddhav thackeray fadanvis bjp gyanvapi masjid sambhaji raje sanjay pawar pm modi

सलीम हिंगोरा, अब्दुल कयुम यांच्यासह आणखी काही जण NIAच्या ताब्यात

छापेमारीत रोख रक्कम, शस्त्र, संशयित कागदपत्रं जप्त


गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली – वकील गुणरत्न सदावर्ते


गृहसचिव, शाह, ओम बिर्लांसह मोठ्या नेत्यांना भेटणार

ठाकरे सरकारनं केलेल्या कारवाईची तक्रार करणार

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ

मुंबई सत्र न्यायालयाची राणा दाम्पत्याला नोटीस

राणा दाम्पत्य दिल्लीत दाखल


 

MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते, तिथं इतके लोक का?

MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, तरीही मोबाईलने फोटो कसे क्लिक केले?

नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो काढले, त्यावेळी अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण?

फोटो काढताना MRI मशीन बंद नव्हती कशावरुन? फक्त फोटोसेशनसाठीच नवनीत राणा तिथं गेल्या नसतील हे कशावरुन?

लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं कसं सुरु होतं?

MRI सुरु असताना सगळे लांब असतात, इथं सगळे जवळ कसे उभे दिसतात?

नवनीत राणांचा MRI रिपोर्ट अद्याप कसा आला नाही?

13. नवनीत राणा घाबरल्या होत्या, तर त्यांचे पाय का बांधण्यात आले नाहीत?

पोटाचा MRI काढला गेला असेल, तर त्यांच्या पोटाला बेल्ट का नव्हता?

नवनीत राणांना जर मानही उचलत नव्हती, तर त्या लगेच बाहेर येऊन कशा बोलल्या?

स्पॉन्डिलीसीसाठी खरंच MRI ची गरज होती का?

मानदुखीचा त्रास होत असेल, तर नवनीत राणांना उशी कशी दिली?

राणांचे फोटो बाहेर आल्यानंतरही लिलावतीत दोषींची चौकशी का झाली नाही?

MRI वेळी रुग्णालयाचे सिक्युरिटी हेडही रुमध्ये होते, मग हे कसं घडू दिलं?

लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर कारवाई का होऊ नये?

ज्यांच्याकडे बंदुक आहे, अशी लोकं सु्ध्दा इथं आली होती. लिलावती हॉस्पीटलमध्ये जे काही झालं ते चुकीचं होतं.

नवनीत राणांचा MRI दरम्यानचे फोटो बाहेर आले

MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते. ही रुम निर्जंतुक असणं गरजेची असते

MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते.

नवनीत राणांचे फोटो काढणारा व्यक्ती आता आला. त्याने मोबाईलने नवनीत राणांचे फोटो काढले.

नवनीत राणा यांचा MRI सुरु होता, म्हणजे MRI मशीन सुरु होती. MRI काढताना दुर्घटना होण्याची शक्यता होती.

असं नसेल, तर नवनीत राणा यांचा खोटा MRI काढल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांचा आहे. लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं सुरु होतं.

लिलावती रुग्णालयात शुटींग कसं झालं? – शिवसेना

नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात मिळालेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह – शिवसेना

सेलिब्रिटींगसाठी वेगळा नियम आहे का? – शिवसेना

स्पॉंडिलायटीस असताना उशी करशी वापरू शकतात – शिवसेना

सर्व उत्तर मिळाल्याशिवाय रुग्णालयातून हलणार नाही – किशोरी पेडणेकर

नवनीत राणांचे MRI चे फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर व मनिषा कायंदे लिलावती रुग्णालयात

याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर व शिवसेना नेत्या मनिषा कायंदे लिलावती रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हजर

नवनीत राणांकडून MRI चे फोटो व्हायरल


आम्ही आशा फाल्तु विषयांवर आम्ही बोलत नाही, आदित्य ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

अयोध्येत दर्शनासाठी जातोय; संघर्ष संपलाय – आदित्य ठाकरे

जनतेबाबतच्या प्रश्नांवर आम्ही बोलतो – आदित्य ठाकरे


आज नवघर पोलिस स्टेशनमध्ये संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे

मेधा सोमय्यांकडून राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

मुंबई पोलिसांना माझी समज आहे

पोलिसांना कारवाई करावीचं लागेल


महागाईविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन

शिवाजी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन

रिकामे सिलेंडर रस्त्यावर ठेवत केला महागाईचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी


 

महापालिकेचे पथक राणांच्या घरी

राणा दाम्पत्याचे मुंबईचे घर मुंबई पालिकेच्या रडारवर


 

नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग


 

विक्रांत आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे समोर येणार – संजय राऊत

ईडीनं धाड टाकलेल्या कंपन्यांची सोमय्यांच्या ट्रस्टला कोड्यवधीची मदत – संजय राऊत

ज्या कंपनीची तक्रार त्याच कंपनीकडून मोठा निधी – संजय राऊत

सोमय्या विक्रांत घोटाळ्यातील आरोपी – संजय राऊत

सोमय्या पोलीस ठाणे गाठण्यापूर्वी राऊतांचा नवीन ‘बॉम्ब’


 

ग्रॅंट रोडमधून सलीम फ्रुट नावाची व्यक्ती एनआयएच्या ताब्यात

मुंबईच्या ग्रॅंट रोड भागात एनआयएचे छापे


खासदार नवनीत राणा थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार


माहिम दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवानीच्या घरी छापे

मुंबईत दाऊदसंबंधीत अनेक जणांवर एनआयएचे छापे

मुंबईत एनआयएची छापेमारी

नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे


 

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ओव्हर हेड वायरल तुटली

बोरिवली ते दहिसर दरम्यन ओव्हरहेड वायर तुटली

ओव्हर हेड वायरच्या दुरूस्तीचे काम सुरू

चर्चगेटच्या दिशेनं येणाऱ्या जलद लोकल वाहतुकीवर परिणामी