घरताज्या घडामोडीLive Updates :जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली

Live Updates :जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली

Subscribe

जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

नागपूरचे नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

तर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ए.बारकुंड यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षकपदी, पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी,

- Advertisement -

तर महाराष्ट्र राज्य सायबरचे पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांची अपर पोलीस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण)चा पदभार देण्यात आला आहे.

 


जायकवाडी पाणी प्रश्नाप्रकरणी राजेश टोपेंचे पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार, मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला


राष्ट्रवादीवरील पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी


उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता विधान भवनात आमदार अपात्रतेवर सुनावणी

मागील सुनावणीत दिली होती पुरावे सादर करण्यासाठी मुदत


शरद पवार गटाकडून युक्तिवाद सुरू

अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद आहेत


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू

शरद पवार सुनावणीवेळी उपस्थित


ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात 8 जणांना 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

इतर पाच जणांना न्यायालयीन कोठडी


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळण्यासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर थोड्याच वेळात सुनावणी

पार्थ पवार, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल


माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह 20 ते 22 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात


भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ

अजित पवार बोलत असताना कार्यक्रमात गोंधळ


धनगर आरक्षणासंदर्भात राज्याकडून समितीची स्थापना

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

समितीमध्ये सुधाकर शिंदेंसह 9 जणांचा समावेश


मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांचे आंदोलन

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर रास्तारोख


पालघर वैतरणा नदीमध्ये बोट उलटून 21कामगार बुडाले; 20 कामगारांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता


भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार

डेंग्यूतून बरे झाल्यानंतर अजित पवारांचा पहिलाच शासकीय कार्यक्रम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे-फडणवीस जोरदार बॅटिंग करणार


बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांकडून आदेश

पोलिसांकडून आतापर्यंत 50 ते 60 जणांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल


संभाजीराजे व ओबीसी नेते यांची आज सायंकाळी 6 वाजता संयुक्त पत्रकार परिषद


अकोल्यात गावगुंडाचा अल्वयीन मुलीवर अमानवी अत्याचार

सिगरेटचे चटके देत, मुंडन करून मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपी गणेश कुमरेला पोलिसांनी अटक केले असून गुन्हा दाखल केला


मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आज सहावा दिवस

मनोज जरांगे पाटलांची आज पुणे, कल्याण आणि नवी मुंबईत जाहीर सभा

मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू

पुण्यातील खराडीमध्ये जरांगे पाटलांच्या तोफ धडाडणार


 

ख्रिसमसनिमित्त गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या

सीएसएमटी, पुणे आणि पनवेल स्थानकावरून विशेष गाड्या सुटणार

गोव्यासाठी 22 डिसेंबरला सीएसएमटी स्थानकावरून विशेष रेल्वे


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार, यासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार

निवडणूक आयोगासमोर सलग तीन दिवस सुनावणी होणार

या सुनावणीदरम्यान अजित पवार उपस्थित राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -