LIVE : महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर दाखल

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या वादातील दोन प्रमुख राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाविकास आघाडी या गटातील आमदारांची धकधक कमालीची वाढली आहे. भाजपला आपल्या बाजुने निर्णय मिळेल असे वाटत असताना महाविकास आघाडीही बहुमत आपल्याकडेच असल्याचे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे लागल्या आहेत.