घरताज्या घडामोडीLive Updates : रोहित पवार यांची साडे आठ तासांनंतर ईडी चौकशी संपली

Live Updates : रोहित पवार यांची साडे आठ तासांनंतर ईडी चौकशी संपली

Subscribe

रोहित पवार यांची साडे आठ तासांनंतर ईडी चौकशी संपली

8 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी बोलावले

- Advertisement -

झारखंडच्या राज्यपालांकडून चंपाई सोरेन यांना अद्याप सरकार स्थापनेचे निमंत्रण नाही


राज्यात 17 हजार 471 पोलिस शिपाई भरतीला मंजुरी

- Advertisement -

भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार

गृह विभागाने 100 टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासन आदेश 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केला


आपल्या देशात दोन भारत आहेत. यापैकी एक असा आहे जो चीनपेक्षा वेगाने पुढे जात आहे. तर दुसरा भारत असा आहे, जिथे 80 कोटी लोकांना अन्नाची पाकिटे द्यावी लागतात, असे वक्तव्य आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले.


राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे – प्रवीण तोगडिया


जुमलेबाज भाजपा सरकारचा आणखी एक जुमेलबाज अर्थसंकल्प – नाना पटोले

सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच मोदी सरकारचे धोरण

गेल्या १० वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी शून्य

शेतकरी, कष्टकरी, तरुण मध्यम वर्गासह सामान्य जनतेच्या अर्थसंकल्पातून घोर निराशा


ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार कार्यालयात दाखल


प्रतिभा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलायता दाखल

रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक भूमिका


आज हिंदुत्वादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक

हिंदू समजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंदची हाक


रोहित पवार यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी

बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडी आज रोहित पवार यांची पुन्हा चौकशी करणार

रोहित पवार आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात जाणार


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक

आज दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद

मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक 2 तास बंद राहणार


उद्धव ठाकरेंचा आजपासून जनसंवाद दौरा सुरू

आज सकाळी पेणमधून उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्याला सुरुवात

रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पाच सभा


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

याचिकेवर आज सकाळी सुनावणी होणार


शरद मोहोळ हत्या प्रकरण : मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नाशिकमधून गणेश मारणेला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -